Nashik : देशात स्वच्छ आणि परवडणाऱ्या ऊर्जेला चालना देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजने’ची (Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme) माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक शहरात विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. ‘सिटी एक्सलरेटर प्रोग्राम’ अंतर्गत ‘नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया’ द्महावितरण, पीडब्ल्यूसी (PwC), शक्ती सस्टेनेबल एनर्जी फाउंडेशन आणि ‘एनर्जीवा व्हेंचर्स’ यांच्या सहकार्याने तयार करण्यात आलेल्या ‘सूर्य रथा’ला रोजी महावितरणचे संचालक (संचलन) धनंजय औंढेकर यांनी विद्युत भवन येथे हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केले.
“प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना (Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme) देशासह राज्यात उच्चतम कामगिरीकडे वाटचाल करत आहे. या योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्यातील नाशिकसह चार मुख्य शहरांमध्ये ‘सूर्य रथ’ उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरेल. सध्या राज्यात ६ हजारांहून अधिक वेंडर्स सक्रिय असून या योजनेमुळे रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. नागरिकांच्या शंका व प्रश्नांचे तत्काळ निवारण करण्यासाठी या योजनेचा फायदा घेण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणचे संचालक (संचलन) धनंजय औंढेकर यांनी यावेळी केले.
https://prahaar.in/2026/06/27/online-betting-worth-crores-in-the-name-of-fifa-world-cup/
या प्रसंगी ‘नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया’चे प्रसून आनंद आणि ‘एनर्जीवा व्हेंचर्स’चे अभिषेक कुलश्रेष्ठ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी अभियंता योगेश निकम यांनी केले. सूत्रसंचालन समीर वडजे यांनी तर आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले.
हा सूर्य रथ पुढील सात दिवस नाशिक शहरातील द्वारका-पाथर्डी, सातपूर, सिडको, गंगापूर आणि पंचवटी व नाशिक रोड सह शहरातील मुख्य भागांतील प्रमुख बाजारपेठा, रुग्णालये, शाळा, महाविद्यालये आणि निवासी वस्त्यांमध्ये फिरणार आहे. रथासोबत सौरऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ उपलब्ध असून, ग्राहक या प्रणालीसाठी पात्र असल्याची तपासणी केली जाईल.यासह सौरऊर्जा तंत्रज्ञानाचे थेट प्रदर्शन आणि योजनेची सविस्तर माहिती मोफत दिली जाणार आहे. जाईल.शासनाकडून मिळणारे अनुदान आणि कर्ज सुविधांची माहिती सुद्धा येथे मिळेल. नाशिककर नागरिकांनी या फिरत्या ‘सूर्य रथा’ला भेट देऊन योजनेचा जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
https://prahaar.in/2026/06/27/another-setback-for-teacher-recruitment-tet-paper-leaked-just-a-day-before-the-exam-tomorrows-exam-temporarily-postponed/
दरम्यान, या उद्घाटन प्रसंगी महावितरणचे मुख्य अभियंते सुंदर लटपटे, प्रवीण परदेशी, अधीक्षक अभियंते देवेंद्र सायनेकर, अनिल थोरात, रमेशकुमार पवार व जगदीश इंगळे यांच्यासह पीडब्ल्यूडी कन्सल्टन्स, नॅशनल सोलर एनर्जी फेडरेशन ऑफ इंडिया’, शक्ती सस्टेनेबल एनर्जी फाउंडेशन आणि ‘एनर्जीवा व्हेंचर्स’चे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.