Nashik : सिडको खुटवडनगर येथील एचपीव्ही लसीकरण शिबिरानंतर १७ वर्षीय श्रावणी अनिल पाटील या निष्पाप मुलीचा झालेला दुर्दैवी मृत्यू अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारा आहे. या घटनेची माहिती मिळताच आमदार सीमा हिरे (MLA Seema Hire) यांनी शुक्रवारी श्रावणीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. पाटील कुटुंबीयांना धीर देत आमदार हिरे यांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याचे आक्रमक आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. वैद्यकीय आणि प्रशासकीय पातळीवर निष्पक्ष चौकशी करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आदेश दिले आहे.
Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर (Amalner) शहरातून मानवी संवेदनशीलतेला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका बेवारस मृतदेहाची दफनविधीसाठी चक्क ...
'त्या' शिबिरात नेमकं काय घडलं ?
खुटवडनगर परिसरातील संकटमोचन हनुमान मंदिर येथे महापालिकेच्या वतीने लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस या शिबिरात दिली जात होती. श्रावणी पाटील ही देखील तिच्या वडिलांसोबत शिबिरात आली होती. माहितीनुसार, सर्पदंश व श्वानदंश प्रतिबंधक लस (Preventive vaccine) घेण्यासाठी श्रावणी तिथे आल्याची प्राथमिक माहिती आहे.
लस टोचल्यानंतर काही मिनिटांतच श्रावणी जवळच असलेल्या एका मेडिकल दुकानाकडे जात असताना अचानक तिला तीव्र चक्कर आली आणि ती भर रस्त्यावर कोसळली. रस्त्यावर कोसळताना तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे. घडलेला प्रकार बघताच तिथे उपस्थित नागरिकांनी आणि तिच्या वडिलांनी तातडीने श्रावणीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Medical Officers) तपासणी केल्यानंतर तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.
नवी दिल्ली : ग्लासगो येथे होणाऱ्या २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय वेटलिफ्टिंग संघाची घोषणा करण्यात आली असून, ऑलिम्पिक पदक विजेती ...
लसीकरणाचा स्लॉट तत्काळ स्थगित करण्याचे निर्देश
दरम्यान, घटना घडल्यानंतर खुटवडनगर येथील लसीकरण केंद्रावरील सुरू असलेला लसीकरणाचा स्लॉट तत्काळ स्थगित करण्याचे कडक निर्देश दिले. तसेच वैद्यकीय आणि प्रशासकीय पातळीवर निष्पक्ष चौकशी करून मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचे आदेश दिले असून, चौकशीत प्रशासनाचा किंवा डॉक्टरांचा कोणताही हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित दोषींवर थेट कठोर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश आमदार सीमा हिरे यांनी दिले आहेत.
दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक (Forensic Report) आणि अंतिम वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे वैद्यकीय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संपूर्ण नाशिककरांचे लक्ष आता शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे. मयत श्रावणीच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.





