FIFA World Cup 2026 : फिफा विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) स्पर्धेत Own Goal चा विक्रम बरोबरीत आला आहे. ट्युनिशियाचा (Tunisia) कर्णधार एलियेस स्कीरी (Ellyes Skhiri) याने नेदरलँड्सविरुद्ध (Netherlands) झालेल्या सामन्यात केलेल्या Own गोलामुळे या स्पर्धेतील Own गोलची संख्या १२ वर पोहोचली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये रशियात (Russia) झालेल्या विश्वचषकातही १२ Own गोलची नोंद झाली होती.
ग्रुप एफ (Group F) मधील कॅन्सस सिटी (Kansas City) येथे झालेल्या सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला डेन्झेल डमफ्रीस (Denzel Dumfries) याने मारलेला लो-क्रॉस (Low Cross) रोखण्याच्या प्रयत्नात स्कीरीकडून चेंडू स्वतःच्याच जाळ्यात गेला. या गोलमुळे नेदरलँड्सला सुरुवातीलाच आघाडी मिळाली आणि संघाने ३-१ असा विजय मिळवत गटात अव्वल स्थान पटकावले. पुरुषांच्या विश्वचषक इतिहासातील एकूण ६६ Own गोलपैकी तब्बल १८ टक्क्यांहून अधिक गोल हे केवळ सुरू असलेल्या २०२६ च्या स्पर्धेत झाले आहेत.
https://prahaar.in/2026/06/26/chaos-in-beijing-plane-crashes-into-1700-foot-china-zun-tower/
या स्पर्धेतील Own गोलची मालिका पराग्वेच्या (Paraguay) डॅमियन बोबाडिला (Damian Bobadilla) याच्यापासून सुरू झाली. त्यानंतर स्वित्झर्लंडचा (Switzerland) मिरो मुहाइम (Miro Muheim), कतारचे (Qatar) मोहम्मद मनाई (Mohamed Manai) आणि महमूद अबुनादा (Mahmud Abunada), इजिप्तचा (Egypt) मोहम्मद हानी (Mohamed Hany), इराकचा (Iraq) आयमेन हुसेन (Aymen Hussein), जॉर्डनचा (Jordan) याझान अल-अरब (Yazan Al-Arab), ऑस्ट्रेलियाचा (Australia) कॅमेरॉन बर्गेस (Cameron Burgess), सौदी अरेबियाचा (Saudi Arabia) हसन अल-तंबक्ती (Hassan Al-Tambakti), उझबेकिस्तानचा (Uzbekistan) गोलरक्षक अब्दुवोहिद नेमातोव (Abduvohid Nematov), मोरोक्कोचा (Morocco) गोलरक्षक यासीन बुनू (Yassine Bounou) आणि आता एलियेस स्कीरी यांच्या नावावर आत्मघातकी गोलांची नोंद झाली आहे.
विशेष म्हणजे, आयमेन हुसेनने नॉर्वेविरुद्ध (Norway) झालेल्या सामन्यात स्वतःच्या संघासाठी एक गोल करण्यासोबतच Own गोलही केला. पुरुषांच्या विश्वचषक इतिहासात एकाच सामन्यात दोन्ही संघांसाठी गोल करणारा तो केवळ तिसरा खेळाडू ठरला. कतार हा एका विश्वचषक स्पर्धेत दोन Own गोल करणारा केवळ तिसरा संघ ठरला आहे. याआधी १९६६ मध्ये बल्गेरिया (Bulgaria) आणि २०१८ मध्ये यजमान रशिया (Russia) यांनी हा नकोसा विक्रम केला होता.
https://prahaar.in/2026/06/26/indias-glorious-victory-at-the-issf-junior-world-championship/
विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक ४ Own गोल मेक्सिकोने (Mexico) केले आहेत. तर फ्रान्सला (France) प्रतिस्पर्धी संघांच्या Own गोलचा सर्वाधिक म्हणजे ६ वेळा फायदा झाला आहे. विश्वचषक इतिहासातील पहिला Own गोल १९३० मध्ये मेक्सिकोचा १८ वर्षीय बचावपटू मॅन्युएल रोसास (Manuel Rosas) याने चिलीविरुद्ध (Chile) केला होता.