Home क्रीडा Pakisthan Team Clash : वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानच्या कोच आणि कर्णधारामध्ये वाद ; नेमकं घडलं काय ?

Pakisthan Team Clash : वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानच्या कोच आणि कर्णधारामध्ये वाद ; नेमकं घडलं काय ?

Pakisthan Team Clash : वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानच्या कोच आणि कर्णधारामध्ये वाद ; नेमकं घडलं काय ?

Mumbai: आयसीसी टी- २० वर्ल्ड कप (ICC T20 World Cup) २०२६ मधून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तान महिला संघात मोठा राडा झाला आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला चार पैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. यामुळे संघात मोठा वाद झाल्याचे दिसून आले.पाकिस्तानची कॅप्टन आणि कोच यांच्यात हा वाद झाला आहे. वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

https://prahaar.in/2026/06/25/clashes-in-legislative-council-between-opposition-and-ruling-party-mcoca-will-be-imposed-on-the-main-accused-assistance-to-the-heirs-of-all-22-deceased-within-7-days/

नेमकं घडलं काय ?

ऑस्ट्रलियाविरुद्धच्या सामन्यात पराभव झाल्याने पाकिस्तानची वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत जाण्याची शक्यता मावळली. सामना संपल्यानंतर पाकिस्तानचा कोच वाहाब रियाज आणि फातिमा सना यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. ऑस्ट्रेलियाने 113 इतक्या मोठ्या धावांच्या फरकाने पराभव केला होता. मोठा पराभव झाल्यामुळे पाकिस्तानचा कोच वाहाब रियाज फातिमा सनावर भलताच भडकला होता. या दोघांसोबत आणखी एक सपोर्ट स्टाफ देखील होता.त्याच्यासमोर मैदानात हा संपूर्ण राडा झाला होता. विशेष म्हणजे या व्हिडीओत फातिमा सनानं बोलताना कोच वाहाब रियाजकडे एकदाही बघितलं नाही.

https://prahaar.in/2026/06/25/r-madhavans-watch-becomes-a-talking-point-while-accepting-the-padma-shri-priced-at-%e2%82%b950-lakh/

याआधी टीम सिलेक्शनवरूनही वाद झाला होता. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सना मीर हिला आलिया रियाजला बाहेर ठेवायचं होतं, पण वहाब रियाज हा आलियाला टीममध्ये ठेवण्यासाठी आग्रही होता.बांगलादेशविरुद्धच्या सामन्याआधी सनाने आलिया रियाज तिच्या पतीसोबत टीमच्या हॉटेल रूममध्ये राहत असल्याबद्दल आक्षेप घेतला. सनाने आक्षेप घेतल्यानंतरच आलिया रियाजचा पती अली युनूस याला हॉटेल रूम सोडायला सांगण्यात आलं.पण बांगलादेशविरुद्धच्या मॅचच्या एक दिवस आधी आलिया टीमसोबत प्रॅक्टिसला न जाता तिच्या पतीसोबत फिरायला गेली, यावरूनही वाद निर्माण झाला.

https://prahaar.in/2026/06/25/lohagad-fort-gains-global-recognition-due-to-its-serpentine-gates-and-the-vinchukata-scorpions-sting-spur/

वर्ल्ड कप २०२६ मध्ये आलिया रियाजची कामगिरी

महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये आलिया रियाज पूर्णपणे अपयशी ठरली आहे. आलियाने 4 सामन्यांमध्ये फक्त 35 रन केल्या आहेत. एकंदरीत काही खेळाडूंना स्पेशल वागणूक आणि शिस्त नसल्यामुळे पाकिस्तानचे वर्ल्ड कप मधील आव्हान संपुष्टात आल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.