Home ब्रेकिंग न्यूज Mumbai Local Train Murder : मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित थरार! क्षुल्लक कारणावरून २२ वर्षीय तरुणाची चाकूने हत्या

Mumbai Local Train Murder : मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित थरार! क्षुल्लक कारणावरून २२ वर्षीय तरुणाची चाकूने हत्या

0
Mumbai Local Train Murder : मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित थरार! क्षुल्लक कारणावरून २२ वर्षीय तरुणाची चाकूने हत्या
murder

मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल पुन्हा एकदा एका धक्कादायक आणि रक्तरंजित घटनेमुळे चर्चेत आली आहे. मुसळधार पावसामुळे लोकलच्या डब्याचा दरवाजा बंद ठेवायचा की उघडा ठेवायचा, या क्षुल्लक कारणावरून झालेला वाद थेट हत्येपर्यंत पोहोचला. चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात २२ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. (Mumbai Local Train Murder)

मयंक लोहार (वय २२) असे मृत तरुणाचे नाव असून तो चर्चगेटहून नालासोपाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करत होता. मंगळवारी मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक प्रवासी दरवाजाजवळ उभे राहून पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी दरवाजा बंद करण्याच्या मुद्द्यावरून मयंक आणि एका सहप्रवाशामध्ये शाब्दिक वाद झाला. (Mumbai Local Train Murder)

https://prahaar.in/2026/06/24/mumbai-monsoon-bmc-heavy-rainfall-in-mumbai-municipal-machinery-ready-rapid-drainage-of-water-from-low-lying-areas/

सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही क्षणांतच उग्र बनला. संतापलेल्या आरोपीने आपल्या जवळील धारदार चाकू काढत मयंकच्या पोटात वार केले. धावत्या लोकलमध्ये अचानक घडलेल्या या प्रकारामुळे डब्यात एकच गोंधळ उडाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मयंकला पाहून प्रवाशांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. (Mumbai Local Train Murder)

https://prahaar.in/2026/06/24/jharkhand-t20-league-jharkhand-t20-league-final-marred-stampede-outside-stadium-35-injured/

बोरिवली स्थानकावर आरोपी फरार :

हल्ल्यानंतर लोकल बोरिवली स्थानकात पोहोचताच आरोपीने गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. जखमी मयंकला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लोहार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस (GRP) आणि रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपीची ओळख पटवण्यासाठी रेल्वे पोलीस विविध तांत्रिक पुराव्यांची तपासणी करत आहेत. (Mumbai Local Train Murder)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here