Home महाराष्ट्र नाशिक Nashik : भरधाव ट्रकची मोपेडला जोरदार धडक; युवकाचा जागीच मृत्यू

Nashik : भरधाव ट्रकची मोपेडला जोरदार धडक; युवकाचा जागीच मृत्यू

0
Nashik : भरधाव ट्रकची मोपेडला जोरदार धडक; युवकाचा जागीच मृत्यू
Jalgaon Accident

Nashik : नाशिकमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Aagra Highway) अपघातप्रवण समजल्या जाणाऱ्या बळी मंदिर परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय. भरधाव ट्रकने मोपेडला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोपेडचालक युवक ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

https://prahaar.in/2026/06/23/sharp-drop-in-gold-and-silver-prices-2/

नेमकं काय घडलं ?

आडगाव शिवारातील बळी मंदिर परिसरातून अवजड वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ असते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी एक युवक आपल्या होंडा ॲक्टिव्हा मोपेडवरून जात असताना ट्रक क्रमांक आरजे २७ जीडी ६२३१ ने त्याच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की युवक रस्त्यावर फेकला गेला आणि दुर्दैवाने ट्रकच्या मागील चाकाखाली आला. गंभीर दुखापतीमुळे त्याचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला.

https://prahaar.in/2026/06/23/nashik-shalarth-id-scam/

पोलीस तात्काळ घटनास्थळी

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, बळी मंदिर परिसरात वारंवार अपघात होत असल्याने अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here