Home ब्रेकिंग न्यूज #HBDNiteshRane : सोशल मीडियावर मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसाचा बोलबाला

#HBDNiteshRane : सोशल मीडियावर मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसाचा बोलबाला

0
#HBDNiteshRane : सोशल मीडियावर मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसाचा बोलबाला

– ‘ट्विटर’वर हॅशटॅग प्रथम क्रमांकावर; राजकीय नेत्यांसह नेटिझन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव

मुंबई : राज्याचे पावसाळी अधिवेशन विविध राजकीय घडामोडींनी गाजत असतानाच, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. मंगळवारी सकाळपासूनच ‘एक्स’वर नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्तचा विशेष हॅशटॅग भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत असल्याचे दिसून आले. सोशल मीडियावरील या ट्रेंडसोबतच विधानसभेतही मंत्री राणे यांचे वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष अभिनंदन करण्यात आले. सभागृहातील सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील अनेक प्रमुख नेत्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून भावी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. (#HBDNiteshRane)

https://prahaar.in/2026/06/23/speaking-his-mind-openly-a-bold-personality-minister-nitesh-rane/

‘एक्स’ प्लॅटफॉर्मवरील भारतीय ट्रेंड्सच्या यादीमध्ये #HBDNiteshRane हा हॅशटॅग प्रथम क्रमांकावर पोहोचला. राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या राजकीय ट्रेंड्सना मागे टाकत नितेश राणे यांच्या समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर हा डिजिटल कौतुकसोहळा घडवून आणला. कोकणासह राज्यभरातून त्यांच्या हजारो चाहत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या विविध भाषणांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे शेअर करत या हॅशटॅगसह शुभेच्छांचा पाऊस पाडला. (#HBDNiteshRane)

https://prahaar.in/2026/06/23/new-architect-of-maharashtras-blue-economy-nitesh-rane/

दुसरीकडे, विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसाची माहिती सभागृहाला देत, त्यांचे प्रथेप्रमाणे अभिनंदन केले. विधानसभेची लॉबी आणि दालनात अनेक आमदार आणि मंत्र्यांनी त्यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. (#HBDNiteshRane)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)