Home ब्रेकिंग न्यूज Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणार, शिवसेनेत प्रवेश करणार

Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणार, शिवसेनेत प्रवेश करणार

0
Omraje Nimbalkar : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणार, शिवसेनेत प्रवेश करणार

धाराशिव : उद्धव समर्थक म्हणून ओळखले जाणारे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणार असल्याची घोषणा केली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांनी ही घोषणा धाराशिवमध्ये कार्यकर्ते आणि मतदार यांच्या उपस्थितीत केली आहे. ओमराजेंच्या घोषणेमुळे उद्धव आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे तर शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे.

https://prahaar.in/2026/06/21/women-farmers-to-be-granted-legal-status/

शिवसेनेचा वर्धापन दिन १९ जून रोजी साजरा झाला. याआधीपासूनच उद्धव समर्थक म्हणून ओळखले जाणारे नऊ पैकी सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आले होते. राज्यसभेत खासदार असलेल्या संजय राऊत यांनीच प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली होती. तर उद्धव यांनी ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊ दे अशी भाषा केली होती. या पार्श्वभूमीवर ओमराजेंनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणार, शिवसेनेत प्रवेश करणार अशी घोषणा केली आहे. आपल्याला सत्तेतील नेतृत्व स्वीकारावे लागेल. जनतेच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतला आहे, असे ओमराजे म्हणाले. ओमराजेंच्या घोषणेमुळे लवकरच होणार असलेल्या जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

https://prahaar.in/2026/06/21/the-voting-and-counting-processes-for-the-general-elections-and-by-elections-of-municipal-councils-and-nagar-panchayats-in-the-state-have-been-completed/

विशेष सीबीआय न्यायालयाने ओमराजे निंबाळकर यांचे वडील, काँग्रेस नेते पवन निंबाळकर आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या २००६ मधील हत्या प्रकरणात निकाल दिला. काँग्रेसचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह आठ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यानंतर ओमराजे म्हणाले होते की, मी आधी माझ्या मतदारसंघात जाईन आणि मग माझ्या समर्थकांशी चर्चा करेन, त्यानंतर दोन दिवसांत निर्णय घेईन. तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवन निंबाळकर हत्या प्रकरणात वरच्या न्यायालयात अर्थात उच्च न्यायालयात सीबीआय दाद मागणार असल्याचे सूतोवाच केले होते. या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर यांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारणार, शिवसेनेत प्रवेश करणार अशी घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here