Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिकेने वेग वाढवला आहे. पाणीपुरवठा विभागांतर्गत चारशे कोटींची मुकणे पाणी योजना, साडेतीनशे कोटींची अमृत योजना तसेच मलनिस्सारण विभागाच्या सतराशे कोटींच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एसटीपी) काम सुरू आहे. ही कामे पावसाळ्यातही अखंड सुरू ठेवण्याच्या सूचना संबंधित मक्तेदार संस्थांना देण्यात येणार आहेत.
https://prahaar.in/2026/06/20/youth-bludgeoned-to-death-with-bricks-over-a-trivial-issue/
सिंहस्थासाठी विल्होळी येथून साधुग्रामपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून, भाविकांना चोवीस तास पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे आहे. मार्च २०२७ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे नियोजन असून, वेळेचे आव्हान लक्षात घेता पावसाळ्यात कामे बंद न ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या सतराशे कोटींच्या एसटीपी प्रकल्पासह ड्रेनेजची कामेही वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सिंहस्थाच्या दृष्टीने ही कामे अत्यंत महत्त्वाची असल्याने पावसाळ्यातही कामांचा वेग कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रस्ते, मुकणे योजना, ड्रेनेज आणि एसटीपी यांसारखी सिंहस्थाशी संबंधित कामे मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे कामे रखडू नयेत यासाठी पालिका प्रशासनाने पावसाळ्यातही कामे सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे.
https://prahaar.in/2026/06/20/nashik-crime-news-fraud-of-%e2%82%b987-lakh-in-the-name-of-kalyan-jewellers/
पावसाळ्यात कामे सुरू ठेवण्याच्या सूचना
पावसाळ्यातही कामे सुरू ठेवण्याबाबत संबंधित मक्तेदार संस्थांना नोटिसा देण्यात येत आहेत. सध्या पावसाचा जोर नसल्याने कामे बंद न ठेवता ती सुरू ठेवावीत. निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पावसाळ्यात कामे सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. — रविद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणी पुरवठा विभाग, मनपा