नाशिक : अशोका विमेन्स अँड चिल्ड्रेन हॉस्पिटल (AWCH), नाशिक येथे वैद्यकीय क्षेत्रातील एक ऐतिहासिक पाऊल टाकत उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या अत्याधुनिक मिनिमली इन्व्हेसिव्ह गायनॅकोलॉजिकल सर्जरी (MIGS) विभागाची स्थापना करण्यात आली आहे. 2D, 3D, 4K आणि ICG फ्लुरोसन्स तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या विभागामुळे उत्तर महाराष्ट्रातील महिलांना अधिक प्रगत आणि विशेष स्त्रीरोग उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या विभागाचे उद्घाटन मुंबईचे ख्यातनाम स्त्रीरोगतज्ज्ञ व लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. मकरंद मसरानी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. सुशील पारख संचालक, अंकिता पारख संचालक, रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर, हितचिंतक, श्री. आशीष सिंह, प्रमुख ऑपरेशन्स व बिझनेस डेव्हलपमेंट आणि डॉ. किशोर टिळे, वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.
https://prahaar.in/2026/06/20/finally-the-rain-god-smiles-upon-trimbakeshwar/
नवीन विभागामध्ये अत्याधुनिक Karl Storz RUBINA® प्रणाली बसविण्यात आली आहे. 2D, 3D, 4K Ultra HD आणि ICCG फ्लुरोसन्स इमेजिंग तंत्रज्ञानाचा एकाच ठिकाणी समावेश असलेला हा उत्तर महाराष्ट्रातील पहिलाच लेप्रोस्कोपिक विभाग (Laparoscopic Unit) ठरला आहे. या क्रांतिकारी तंत्रज्ञानामुळे शस्त्रक्रियांमध्ये कमालीची अचूकता, सुरक्षितता आणि उत्तम उपचार परिणाम साध्य होणार आहेत.
यावेळी बोलताना डॉ. सुशील पारख (संचालक, अशोका इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस अँड रिसर्च) यांनी सांगितले की:
“MIGS विभागामध्ये हिस्टेरोस्कोपिक मायोमेक्टॉमी, टोटल लेप्रोस्कोपिक हिस्टरेक्टॉमी (TLH), लेप्रोस्कोपिक मायोमेक्टॉमी, एंडोमेट्रिओसिस शस्त्रक्रिया, ओव्हेरियन सिस्टेक्टॉमी तसेच जन्मजात विकृतींसाठी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया यांसारख्या प्रगत उपचार सुविधा उपलब्ध असतील. तसेच ट्यूबल इव्हॅल्युएशन, अॅड्हेसिओलायसिस आणि प्रजनन क्षमता जपणाऱ्या एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया देखील येथे केल्या जाणार आहेत.”
https://prahaar.in/2026/06/20/pm-kisan-samman-yojana/
डॉ. संदीप सोनावणे (स्त्रीरोगतज्ज्ञ व लेप्रोस्कोपिक सर्जन) म्हणाले:
*3D, 4K आणि ICG फ्लुरोसन्स-मार्गदर्शित इमेजिंगच्या साहाय्याने गुंतागुंतीच्या स्त्रीरोग शस्त्रक्रिया अधिक अचूक आणि सुरक्षित पद्धतीने करता येतात. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हे एकत्रित प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे शस्त्रक्रियेचा आघात कमी होतो, रुग्ण अत्यंत वेगाने बरे होतात आणि शक्य तितक्या प्रमाणात प्रजनन क्षमता जपता येते, ज्यामुळे महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल.”
अंकिता पारख (संचालक, अशोका इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस अँड रिसर्च) यांनी सांगितले की:
“अशोका दिमेन्स अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये, आमची वचनबद्धता केवळ सहानुभूतीपूर्वक काळजी घेण्याचीच नाही, तर उत्तर महाराष्ट्रातील महिलांसाठी जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान आणि प्रगत वैद्यकीय कौशल्य सातत्याने उपलब्ध करून देण्याची आहे. ‘Karl Storz RUBINA ®’ प्रणालीची स्थापना – जी सर्वात प्रगत मिनिमली इन्व्हेसिव्ह गायनॅकोलॉजिकल सर्जरी (MIGS) यंत्रणा आहे आणि उत्तर महाराष्ट्रातील या प्रकारची पहिलीच प्रणाली आहे-ही आमच्या याच वचनबद्धतेचे प्रतीक आहे. ‘MIGS’ विभागासारख्या उपक्रमांच्या माध्यमातून, उपचारांचे जागतिक स्तरावर मान्य असलेले निकष स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध करून देणे हे आमचे ध्येय आहे.”
https://prahaar.in/2026/06/20/pavanraje-nimbalkar-murder-case-accused-acquitted-padmasinh-patil-and-all-others-acquitted-due-to-lack-of-evidence/
प्रमुख पाहुणे डॉ. मकरंद मसरानी यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, अत्याधुनिक मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियांमुळे गुंतागुंतीच्या स्त्रीरोगांच्या उपचारांमध्ये क्रांतिकारी बदल झाला आहे. हा स्वतंत्र MIGS विभाग महिलांना अधिक सुरक्षित. अचूक आणि प्रजनन क्षमता जपणारे उपचार पर्याय उपलब्ध करून देईल.
या नवीन विभागाच्या स्थापनेमुळे अशोका विमेन्स अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलने नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान व उच्च दर्जाचे शस्त्रक्रिया कौशल्य उपलब्ध करून देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे.