मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येत असून, १९ आणि २० जून रोजी ते कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील महत्त्वाकांक्षी विकास आराखड्या अंतर्गत पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि निर्माणाधीन प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या दौऱ्यामध्ये गृहमंत्र्यांच्या हस्ते ऐतिहासिक विकासकामांचे लोकार्पण होणार असल्याने, प्रशासकीय व राजकीय वर्तुळात या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.(FIFA WORLDCUP 2026)
https://prahaar.in/2026/06/18/ubt-faction-rebel-mps-defied-the-ubt-whip/
१९ जून रोजी अंबाबाई मंदिर (Ambabai Mandir) परिसराच्या सौंदर्यीकरण आणि पायाभूत सुविधांशी संबंधित पूर्ण झालेल्या कामांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते पार पडेल. कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचा कायापालट करण्यासाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष विकास आराखडा राबवला जात आहे. यामध्ये प्रामुख्याने गर्दी व्यवस्थापन, रस्ते सुधारणा, स्वच्छता व्यवस्था आणि अत्याधुनिक सुविधा केंद्रे उभारणीचा समावेश आहे.दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २० जून रोजी विकासकामांची पाहणी आणि अधिकृत कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर अमित शाह यांची भव्य जाहीर सभा कोल्हापुरात होणार आहे. या सभेत ते केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजना, राज्यातील पायाभूत प्रकल्पांची प्रगती यावर प्रकाश टाकण्यासोबतच, ताज्या राजकीय घडामोडींवर काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.