Home ब्रेकिंग न्यूज Sharad Pawar NCP : शरद पवारांकडून स्वपक्षातील खासदारांशी संपर्क सुरू; ‘उबाठा’ फुटीमुळे सतर्कता

Sharad Pawar NCP : शरद पवारांकडून स्वपक्षातील खासदारांशी संपर्क सुरू; ‘उबाठा’ फुटीमुळे सतर्कता

0
Sharad Pawar NCP : शरद पवारांकडून स्वपक्षातील खासदारांशी संपर्क सुरू; ‘उबाठा’ फुटीमुळे सतर्कता
sharad pawar

– लवकरच संसदीय दलाची बैठक बोलावणार

मुंबई : उबाठाच्या ६ खासदारांनी पुकारलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीच्या गोटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. या फुटीचे पडसाद आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातही उमटू लागले असून, संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार कमालीचे सतर्क झाले आहेत. उबाठातील भूकंपानंतर शरद पवार गटाने आपल्या सर्व ८ लोकसभा खासदारांशी वैयक्तिक संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. कोणत्याही खासदाराची नाराजी पक्षाला महागात पडू नये, यासाठी पुढील एक-दोन दिवसांत पक्षाच्या संसदीय दलाची तातडीची बैठक दिल्लीत बोलावली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. (Sharad Pawar NCP)

https://prahaar.in/2026/06/17/shiv-sena-ubt-another-split-in-ubt-six-mps-join-shindes-camp/

ठाकरे गटाचे जे ६ खासदार स्वतंत्र गट स्थापन करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत, त्यांच्या नाराजीचे मुख्य कारण पक्षप्रमुखांची न मिळणारी भेट आणि मतदारसंघातील कामांकडे होणारे दुर्लक्ष हेच होते. उद्धव ठाकरे यांना आपले ९ खासदार एकसंध ठेवण्यात आलेले अपयश पाहता, शरद पवारांनी तातडीने पावले उचलली आहेत. खासदारांच्या मनात कोणतीही धुसफूस किंवा तक्रारी असल्यास त्या ऐकून घेण्यासाठी आणि त्यांचे वेळीच निवारण करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. (Sharad Pawar NCP)

https://prahaar.in/2026/06/17/rashmi-shukla-new-responsibility-for-rashmi-shukla-she-will-keep-a-close-watch-on-the-conduct-of-public-representatives-and-officials/

शरद पवार (Sharad Pawar NCP) गटाच्या या अस्वस्थतेमागे गेल्या काही महिन्यांत बदललेली राजकीय गणिते कारणीभूत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने उत्तम कामगिरी करत ८ खासदार निवडून आणले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णपणे उलटे झाले. विधानसभेत अवघे १० आमदार निवडून आल्याने पक्षाची कामगिरी निराशाजनक झाली. त्यामुळे शरद पवार गटाच्या काही खासदारांमध्ये आपल्या राजकीय भविष्याविषयी आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीविषयी चिंता निर्माण झाल्याची चर्चा आहे. विरोधी बाकांवर राहून मतदारसंघाचा विकास कसा करायचा, हा प्रश्न खासदारांना सतावत आहे. हीच अस्वस्थता ओळखून सत्ताधारी त्यांच्याशीही संपर्क साधू शकतात, अशी दाट शक्यता असल्याने शरद पवारांनी आपल्या सर्व शिलेदारांना एकत्र ठेवून त्यांना धीर देण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. (Sharad Pawar NCP)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here