Home देश Madhya Pradesh : अफवा पसरली आणि रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली

Madhya Pradesh : अफवा पसरली आणि रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली

0
Madhya Pradesh : अफवा पसरली आणि रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली

मोरेना : मध्य प्रदेशमधील मोरेना जिल्ह्यातील हेतमपूर – घेर विभागाजवळ अफवा पसरल्यामुळे रेल्वे रुळावर मोठी दुर्घटना झाली. घाबरलेल्या प्रवाशांनी धावत्या गाडीतून रुळांवर उड्या मारल्या. त्याचवेळी समोरच्या रुळांवरून वेगाने आलेल्या गाडीने प्रवाशांना धडक दिली. यामुळे चार जणांचा रुळांवरच मृत्यू झाला.

https://prahaar.in/2026/06/14/metro-path-cleared-for-the-metro-4-mogarpada-car-depot-route/

अपघात प्रकरणी एका प्रवाशाने माहिती दिली. इंटरसिटीमध्ये आग लागल्याची बातमी पसरली. याच सुमारास गाडीचा वेग कमी झाला आणि गाडी रुळांवर थांबली. गाडी थांबण्याचे नेमके कारण माहिती नाही. पण आग लागल्याचे ज्यांनी ऐकले त्यापैकीच काही प्रवासी धावत्या गाडीतून उड्या मारून रुळांवर उतरले. नेमकी त्याचवेळी समोरच्या रुळांवरून वेगाने एक गाडी आली. इंटरसिटीमधून उड्या मारलेल्यांपैकी सर्वांना रुळ ओलांडून बाजूला होण्याची संधी मिळाली नाही. वेगाने आलेल्या गाडीने प्रवाशांना धडक दिली. यामुळे चार जणांचा रुळांवरच मृत्यू झाला; असे प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.

https://prahaar.in/2026/06/14/narendra-modi-innovation-is-in-indias-dna/

एक महिला प्रवासी आणि तिचे मूल यांचा रेल्वेची धडक बसल्याने मृत्यू झाला त्यावेळी त्या महिलेचा पती दुसऱ्या मुलाला घेऊन गाडीतून उतरण्याची तयारी करत होता. पती आणि दुसरे मूल उतरले नसल्यामुळे सुरक्षित राहिले.या प्रकरणी चौकशी होणार आहे.