Home ब्रेकिंग न्यूज पुणे यार्डात विशेष ब्लॉक; जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ गाड्या रद्द

पुणे यार्डात विशेष ब्लॉक; जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ गाड्या रद्द

0
पुणे यार्डात विशेष ब्लॉक; जळगाव-भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ गाड्या रद्द
train

trains cancelled : मध्य रेल्वे प्रशासनाकडून (Central Railway Administration) पुणे यार्डात पायाभूत सुविधांच्या उन्नतीकरणासह सिग्नलिंग यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी विशेष वाहतूक (ट्रॅफिक) व पॉवर ब्लॉक मंजूर करण्यात आला आहे. या कामाचा परिणाम जळगाव व भुसावळमार्गे धावणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांवर (Express trains) होणार असून, काही गाड्या रद्द तर काहींच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांची स्थिती तपासूनच नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

विशेष ब्लॉकमुळे दोन एक्स्प्रेस गाड्या रद्द

पुणे यार्डातील डीडीएस पॉइंट क्रमांक २०८/२०९ बदलण्यासह सिग्नल आणि पॉइंट व्यवस्थेचे आधुनिकीकरण डीसीएन प्रणाली (DCN system) अंतर्गत करण्यात येणार आहे. रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता वाढविणे, गाड्यांची हालचाल अधिक वेगवान आणि कार्यक्षम करणे तसेच भविष्यातील वाढत्या रेल्वे वाहतुकीसाठी यार्ड सक्षम बनविण्याच्या उद्देशाने ही कामे केली जात आहेत. या विशेष ब्लॉकमुळे दोन महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक १२१३५ पुणे–नागपूर एक्स्प्रेस १४ जून रोजी पुणे येथून सुटणार नाही. तसेच गाडी क्रमांक १२१३६ नागपूर–पुणे एक्स्प्रेस १३ जून रोजी नागपूरहून सुटणार नसून तीही पूर्णपणे रद्द राहणार आहे.

https://prahaar.in/2026/06/11/beloved-sisters-will-soon-receive-the-may-installment/

दोन गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन

याशिवाय, दोन गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन (Short Termination) करण्यात आले आहे. गाडी क्रमांक ११०७८ जम्मूतवी–पुणे झेलम एक्स्प्रेस १२ जून रोजी हडपसर येथेच प्रवास समाप्त करेल. तर गाडी क्रमांक ११४०६ अमरावती–पुणे एक्स्प्रेस १३ जून रोजी हडपसरपर्यंतच धावेल. त्यामुळे हडपसर ते पुणे दरम्यानचा प्रवास प्रवाशांना पर्यायी वाहतुकीने करावा लागणार आहे. दरम्यान, गाडी क्रमांक २२१७१ पुणे–रानी कमलापती एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ही गाडी १४ जून रोजी दुपारी ३.१५ वाजता सुटण्याऐवजी सायंकाळी ७.५५ वाजता पुणे स्थानकातून रवाना होणार आहे. म्हणजेच गाडी तब्बल ४ तास ४० मिनिटे उशिराने धावणार आहे.

https://prahaar.in/2026/06/11/stand-up-comedian-pranit-more-has-shut-down-his-own-instagram-account/

भविष्यात वाहतुकीतील अडथळे कमी होण्यास मदत

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पुणे यार्ड हे मध्य रेल्वेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आणि व्यस्त केंद्र आहे. दररोज शेकडो प्रवासी व मालगाड्यांची ये-जा याठिकाणाहून होत असते. त्यामुळे यार्डातील सिग्नलिंग आणि पॉइंट यंत्रणा अत्याधुनिक करणे आवश्यक बनले होते. प्रस्तावित काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे संचालन अधिक सुरक्षित, वेगवान आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे. भविष्यात वाहतुकीतील अडथळे कमी करण्यासही फायदा होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here