Home ब्रेकिंग न्यूज Raj Thackeray: वाढदिवशी होर्डिंग्जऐवजी झाडे लावा, पाणवठे उभारा!

Raj Thackeray: वाढदिवशी होर्डिंग्जऐवजी झाडे लावा, पाणवठे उभारा!

0
Raj Thackeray: वाढदिवशी होर्डिंग्जऐवजी झाडे लावा, पाणवठे उभारा!

– राज ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना आवाहन; १४ जूनला मुंबईत नसल्याने भेटीला येऊ नका

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर मनसे कार्यकर्त्यांना (MNS) आणि हितचिंतकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. दरवर्षीप्रमाणे १४ जूनला होणारी गर्दी, पुष्पगुच्छ, मिठाई आणि शहरांमधील होर्डिंग्जबाजीऐवजी यावर्षीचा वाढदिवस पर्यावरणपूरक आणि लोकोपयोगी उपक्रमांनी साजरा करावा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर्षी वाढदिवसाच्या दिवशी स्वतः मुंबईत उपस्थित नसल्यामुळे कार्यकर्त्यांशी भेट होऊ शकणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी ‘महाराष्ट्र सैनिकांना’ सोशल मीडियावरील ‘लाईक्स’पेक्षा निसर्गाचे आशीर्वाद कमावण्याचा सल्ला दिला आहे.

https://prahaar.in/2026/06/11/case-registered-against-cab-driver-who-assaulted-elderly-man-in-thane-police-take-action-after-14-hours/

आपल्या पत्रातून राज ठाकरे यांनी राज्यातील वाढत्या पर्यावरणीय संकटावर चिंता व्यक्त केली आहे. यंदाचा उन्हाळा अत्यंत भीषण होता आणि हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यावर्षीचा पावसाळाही सरासरीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. पाऊस कमी पडल्यास पुढील वर्षी पाण्याचे दुर्भिक्ष अधिक वाढेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. सद्यस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सरकारवरही शरसंधान केले. राज्यात आणि देशात सध्या बेसुमार वृक्षतोड सुरू असून, जंगले उद्ध्वस्त करून इमारतींची जंगले उभी करण्यातच सरकार व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली. ही परिस्थिती अशीच राहिली, तर भविष्यात मुलांना प्राणिसंग्रहालयासारखे झाडे दाखवण्यासाठी कुठेतरी घेऊन जावे लागेल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर मनसे सैनिकांनी १४ जून रोजी राज्यभरात फुलांची, फळांची किंवा दीर्घकाळ टिकतील अशी मोठी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घ्यावा, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. ही झाडे लावताना स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या हस्ते रोपण करावे आणि संगोपनाची जबाबदारी सोपवावी, जेणेकरून हा एक दिवसाचा सोहळा न ठरता झाडे दीर्घकाळ टिकतील. तसेच रस्ते रुंदीकरणात ही झाडे तुटणार नाहीत, याचीही काळजी घेण्यास त्यांनी सांगितले आहे.

https://prahaar.in/2026/06/11/appeal-to-amarathi-drivers-to-learn-marathi-for-the-preservation-of-marathi-language-media-also-urged-to-cooperate/

काय म्हणाले राज ठाकरे?

वृक्षारोपणासोबतच उन्हाळ्यात आणि पावसाळ्यानंतर प्राणी-पक्ष्यांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्यासाठी जंगलांच्या वेशीवर आणि शहरांमध्ये भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारण्याची सूचना त्यांनी केली आहे. काही महिन्यांपूर्वी चंद्रपूरमध्ये पाण्यासाठी भटकणाऱ्या प्राण्यांची दृश्ये पाहून आपण स्थानिक सहकाऱ्यांमार्फत तात्काळ पाणवठे उभारल्याचा दाखलाही त्यांनी दिला. वृक्षारोपण आणि पाणवठे उभारताना स्थानिक शासकीय यंत्रणेची मदत घेण्याची सूचना त्यांनी केली आहे. फोटो काढून सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी हा उपक्रम न करता, तो प्रामाणिकपणे राबवावा, अशी अपेक्षा व्यक्त करत राज ठाकरे यांनी लवकरच कार्यकर्त्यांशी सविस्तर संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here