Home महाराष्ट्र ठाणे Metal Pins Found in Birthday Cake in Thane : ठाण्यात वाढदिवसाच्या थीम केकमध्ये निघाल्या धातूच्या पिन्स; ३ वर्षीय मुलाने केकसोबत गिळल्या दोन मेटल पिन्स

Metal Pins Found in Birthday Cake in Thane : ठाण्यात वाढदिवसाच्या थीम केकमध्ये निघाल्या धातूच्या पिन्स; ३ वर्षीय मुलाने केकसोबत गिळल्या दोन मेटल पिन्स

0
Metal Pins Found in Birthday Cake in Thane : ठाण्यात वाढदिवसाच्या थीम केकमध्ये निघाल्या धातूच्या पिन्स; ३ वर्षीय मुलाने केकसोबत गिळल्या दोन मेटल पिन्स
Thane Birthday Cake Metal Pins

ठाणे : वाढदिवस अधिक खास करण्यासाठी थीम (Theme) केकची निवड करणाऱ्या पालकांसाठी धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. ३ वर्षीय रियांशने वाढदिवसाच्या केकवरील चॉकलेटसोबत दोन धातूच्या पिन्स (Metal Pins) गिळल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे कुटुंबीयांना तब्बल ४८ तास चिंतेत दिवस काढावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट परिसरात राहणाऱ्या बायोलॉजी शिक्षिका स्नेहा शेलार यांच्या मुलगा रियांशचा वाढदिवस होता. त्यानिमित्त खास थीम (Theme) केक ऑर्डर (Cake Order) करण्यात आला होता. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. यावेळी रियांशने केकवरील चॉकलेट बॉल्स खाल्ले.

https://prahaar.in/2026/06/11/satara-soldier-martyred-laid-down-his-life-while-on-duty-in-the-uri-sector-mourning-over-the-death-of-the-soldier-from-satara/

मात्र काही वेळानंतर केकच्या सजावटीसाठी (Decoration) ठेवलेल्या चॉकलेट बॉल्सना आधार देण्यासाठी धातूच्या पिन्स (Metal Pins) वापरण्यात आल्याचे घरातील मोठ्या मुलांच्या लक्षात आले. रियांशने चॉकलेट सकट दोन पिन्सही गिळल्या. त्यानंतर त्याला तातडीने ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात (Jupiter Hospital) दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया (Surgery) करण्याची गरज नसल्याचे सांगत पिन्स नैसर्गिकरीत्या (Naturally) शरीरातून बाहेर पडण्याची वाट पाहण्याचा सल्ला दिला. अखेर ४८ तासांनंतर दोन्ही पिन्स शरीरातून बाहेर पडल्या आणि कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

रियांशची आई स्नेहा शेलार यांनी समाजमाध्यमावरील (Social Media) पोस्टमधून संताप व्यक्त केला. “लहान मुलासाठी केक तयार केला जात असल्याची माहिती असूनही बेकरी चालकाने धातूच्या पिन्स (Metal Pins) वापरल्याबाबत कोणतीही पूर्वसूचना दिली नाही. आमच्यासाठी हा वाढदिवस आनंदाऐवजी भीतीचा अनुभव ठरला,” असा आरोप त्यांनी केला. सुदैवाने रियांशची प्रकृती आता स्थिर (Stable) असून तो धोक्याबाहेर आहे. मात्र या घटनेमुळे अन्नसुरक्षा (Food Safety) आणि केक सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here