नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सलग पदावर राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान ठरले आहेत. बुधवारी त्यांच्या कार्यकाळाचे ४,३९९ दिवस पूर्ण झाले. यासह त्यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा ४,३९८ दिवसांचा विक्रम मागे टाकला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारतीय जनता पक्षाने (भाजपा) त्यांचे अभिनंदन केले आहे. (PM Narendra Modi)
https://prahaar.in/2026/06/10/pm-narendra-modis-new-record-modis-historic-record-surpassed-even-nehru-a-shower-of-best-wishes-from-leaders-across-the-globe/
नितीन नवीन यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक ऐतिहासिक बदल अनुभवले आहेत. वित्तीय समावेशन, डिजिटल क्रांती आणि ‘एक राष्ट्र, एक कर’ व्यवस्थेमुळे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासनाला नवी बळकटी मिळाली आहे. तसेच संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, उत्पादन क्षेत्राला मिळालेले प्रोत्साहन आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या विस्तारामुळे विकासाला नवी गती मिळाली आहे. (PM Narendra Modi)
View this post on Instagram