Home क्राईम Crime News : डॉक्टर की शैतान ! आधी 8000 रुपयात हाड जोडली, नंतर उरलेले पैसे न दिल्याने डॉक्टरने केले असे काही की ऐकून तुम्हालांही धक्का बसेल

Crime News : डॉक्टर की शैतान ! आधी 8000 रुपयात हाड जोडली, नंतर उरलेले पैसे न दिल्याने डॉक्टरने केले असे काही की ऐकून तुम्हालांही धक्का बसेल

0
Crime News : डॉक्टर की शैतान ! आधी 8000 रुपयात हाड जोडली, नंतर उरलेले पैसे न दिल्याने डॉक्टरने केले असे काही की ऐकून तुम्हालांही धक्का बसेल
Mira-Bhainder crime

Uttar Pradesh Crime News : मृत्यूच्या खाईतून रुग्णाला परत आणणाऱ्या डॉक्टरला देवाचं दुसरं रूप समजलं जातं. पण हाच डॉक्टर बऱ्याचदा शैतान बनतो. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथून अशीच शैतानरूपी डॉक्टरची धक्कादायक घटना समोर आली आहे. पैसा हा जिवापेक्षा जास्त आहे का ? हा प्रश्न या घडलेल्या घटनेतून उपस्थित होत आहे.

नेमका आरोप काय ?

पीडिता रेश्मा यांच्या म्हणण्यानुसार, दीड महिन्यापूर्वी त्यांच्या मुलीच्या उजव्या पायाला दुखापती झाली होती. मुलीच्या उजव्या पायाच्या हाडाच्या दुखापतीवर जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या उपचारासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला २५ हजार रुपयांची मागणी केली. आपण विधवा असून इतकी रक्कम देऊ शकत नाही असे सांगितल्यानंतर कर्मचाऱ्यांनी उपचार करण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे.

त्यानंतर रेश्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना (सीएमओ) मुलीवर मोफत उपचार करण्याचे आदेश दिले. मात्र या आदेशानंतरही रुग्णालय कर्मचाऱ्यांनी ८ हजार रुपये घेतले तर उर्वरित रक्कम नंतर जमा करण्यास सांगण्यात आल्याचा दावा महिलेने केला आहे.

https://prahaar.in/2026/06/04/monsoon-arrives-strongly-in-kerala/

नेमकं प्रकरण काय ?

पीडितेची आई, रेश्मा यांच्या माहितीनुसार, सुमारे दीड महिन्यापूर्वी त्यांच्या मुलीच्या उजव्या पायावर जिल्हा रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी या प्रक्रियेसाठी २५,००० रुपयांची मागणी केली. ज्यावेळी त्या महिलेने, आपण विधवा असल्याचा दावा करत, पैसे देण्यास असमर्थता दर्शवली, तेव्हा त्यांनी उपचार करण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील केले, त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याला मोफत उपचार देण्याचे आदेश दिले. असे असूनही, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ८,००० रुपये घेतले आणि उर्वरित रक्कम नंतर द्यावी लागेल असे सांगितले.

डॉक्टरांनेच गुडघा मोडला

आरोपानुसार, शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांनी मुलीला पुन्हा रुग्णालयात बोलावण्यात आले होते. त्यावेळी शस्त्रक्रिया करणारे डॉ. चतुर्वेदी यांनी मुलीचा गुडघा जबरदस्तीने वाकवण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगी मोठमोठ्याने रडत होती. मात्र डॉक्टरला तिची किंवा आली नाही. या सर्वात तिच्या पायातील हाड मोडल्यासारखा आवाज आल्याचा दावा देखील महिलेने केला आहे.

याबाबत तक्रार केली असता महिलेचे त्याठिकाणी कोणीही एकून घेतले नाही. त्यानंतर खासगी ठिकाणी एक्स-रे काढण्यात आला असता मुलीचे हाड पुन्हा मोडल्याचे समोर आल्याचे रेश्मा यांनी सांगितले. यानंतर त्यांनी वरिष्ठ डॉक्टरांकडे तक्रार केली, मात्र कुणीही त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचा आरोप आहे.

https://prahaar.in/2026/06/04/pm-suryaghar-free-electricity-scheme/

सीएमओंकडून चौकशीचे आदेश

या गंभीर आरोपांनंतर मुझफ्फरनगरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनील तेवतिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दुसऱ्या पक्षाचे म्हणणे ऐकल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

तसेच चौकशीत डॉक्टर किंवा रुग्णालय कर्मचाऱ्यांची कोणतीही निष्काळजीपणा अथवा गैरप्रकार आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही सीएमओंनी म्हटले आहे. या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालयातील उपचार पद्धती आणि रुग्णांकडून होणाऱ्या कथित आर्थिक वसुलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here