भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने नॉर्वे बुद्धिबळ २०२६ मध्ये (Norway Chess Tournament Praggnanandh) आणखी एक संस्मरणीय कामगिरी केली. त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनला क्लासिकल सामन्यात पराभूत करून इतिहास रचला. या स्पर्धेत कार्लसनविरुद्धचा हा त्याचा दुसरा क्लासिकल विजय होता. या कामगिरीमुळे, प्रज्ञानानंद नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत क्लासिकल प्रकारात कार्लसनला दोनदा पराभूत करणारा पहिला भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. तसेच, यावर्षी क्लासिकल सामन्यांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बुद्धिबळपटूला दोनदा पराभूत करणारा तो पहिला बुद्धिबळपटू आहे.
https://prahaar.in/2026/06/03/khan-sir-coaching-classes-fire-attack-on-khan-sirs-coaching-center-some-people-are-troubled-because-of-my-success-khan-sir-makes-serious-allegations-against-rival-institutions/
या विजयामुळे प्रज्ञानानंद १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे आणि स्पर्धेच्या विजेतेपदाच्या शर्यतीत तो कायम आहे. दुसरीकडे, कार्लसनची यावेळची कामगिरी अस्थिर राहिली आहे. त्याने आतापर्यंत चार क्लासिकल सामने गमावले आहेत, त्यापैकी दोन सामने प्रज्ञानानंदविरुद्ध होते. अमेरिकन ग्रँडमास्टर वेस्ली सो १४ गुणांसह स्पर्धेत अव्वल स्थानी कायम आहे. आर्मागेडॉन टायब्रेकरमध्ये जर्मनीच्या व्हिन्सेंट केमरला पराभूत करून त्याने आपली आघाडी अधिक मजबूत केली. दरम्यान, फ्रान्सच्या अलीरेझा फिरौजाने क्लासिकल सामन्यात विद्यमान विश्वविजेता डी. गुकेशला पराभूत करून १३ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. (Norway Chess Tournament Praggnanandh)
https://prahaar.in/2026/06/03/pre-monsoon-rains-make-a-strong-appearance-in-mumbai-mumbaikars-rush-to-get-ready-for-the-first-showers/