अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहरात अवैधरीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली असून या कारवाईत २९० हून अधिक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत यापैकी १३१ जण बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले असून ते भारतात बेकायदेशीररित्या राहत असल्याची माहिती समोर आली आहे. उर्वरित १६० हून अधिक संशयितांच्या ओळखीची आणि नागरिकत्वाची पडताळणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Bangladeshi Nationals Detained In Ahmedabad)
https://prahaar.in/2026/06/03/crude-oil-prices-hike-again-due-to-rising-tensions-in-west-asia/
चौकशीदरम्यान १३१ जणांकडे भारतीय नागरिकत्वाचे वैध पुरावे नसल्याचे आढळून आले. हे सर्वजण बांगलादेशातून भारतात बेकायदेशीररित्या दाखल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती किती काळापासून अहमदाबादमध्ये राहत होत्या, त्या कोणत्या व्यवसायांमध्ये कार्यरत होत्या आणि त्यांना स्थानिक स्तरावर कोणाची मदत मिळाली होती का, याचाही तपास सुरू आहे. (Bangladeshi Nationals Detained In Ahmedabad)
https://prahaar.in/2026/06/03/pune-nasrapur-girl-death-case-update/
अवैध घुसखोरी रोखण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांविरुद्ध परदेशी नागरिक कायदा आणि इतर लागू कायद्यांनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अहमदाबाद पोलिसांनी स्पष्ट केले. (Bangladeshi Nationals Detained In Ahmedabad)