बैरूत : इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केलेल्या आवाहनानंतरही दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायली लष्कराच्या कारवाया थांबलेल्या नाहीत. ट्रम्प यांनी युद्धविराम आणि संयमाचे संकेत दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यांमध्ये किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. (Israel vs Lebanon)
https://prahaar.in/2026/06/03/surat-st-bus-accident-7-people-died-and-41-passengers-were-injured-in-a-horrific-st-accident-in-gujarat-know-exactly-how-the-accident-happened/
ट्रम्प यांच्या घोषणेनंतरही कारवाया कायम :
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अलीकडेच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केल्याचा दावा केला होता. त्यानंतर त्यांनी लेबनॉनची राजधानी बैरूत येथे कोणतीही मोठी लष्करी कारवाई होणार नसल्याचे जाहीर केले होते. या वक्तव्यामुळे संघर्ष कमी होण्याची आशा निर्माण झाली होती. मात्र त्यानंतर लगेचच झालेल्या ड्रोन हल्ल्यांमुळे परिस्थिती पुन्हा चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. (Israel vs Lebanon)
ट्रम्प-नेतान्याहू संभाषण तणावपूर्ण?
अमेरिकन प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यातील दूरध्वनीवरील संभाषण अत्यंत तणावपूर्ण झाले होते. ट्रम्प यांनी लेबनॉनमधील वाढत्या लष्करी कारवायांबाबत नाराजी व्यक्त करत इस्रायलला संयम बाळगण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर नेतान्याहू यांनी बैरूतवर नियोजित असलेला मोठा हल्ला रद्द केल्याची माहितीही काही माध्यमांनी दिली होती. मात्र दक्षिण लेबनॉनमधील ड्रोन कारवाया सुरू राहिल्याने त्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Israel vs Lebanon)
https://prahaar.in/2026/06/02/monsoon-on-the-threshold-of-kerala/
इराणने मध्यस्थांशी चर्चा थांबवल्याचा दावा :
मध्यपूर्वेत पुन्हा संघर्ष भडकण्याची भीती :
इस्रायल-हिजबुल्लाह संघर्षाचा विस्तार झाल्यास त्याचे परिणाम संपूर्ण मध्यपूर्वेवर होऊ शकतात, अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. एका बाजूला अमेरिका युद्धविरामासाठी प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूला सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे प्रदेशातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत इस्रायल, लेबनॉन, हिजबुल्लाह आणि इराण यांच्यातील घडामोडींवर जगाचे लक्ष लागले आहे. (Israel vs Lebanon)