Home ब्रेकिंग न्यूज BMC News : वरळीतील कोस्टल रोडवरील लोटस जेट्टी ते समुद्र महालपर्यंत नवीन विहारपथ

BMC News : वरळीतील कोस्टल रोडवरील लोटस जेट्टी ते समुद्र महालपर्यंत नवीन विहारपथ

0
BMC News : वरळीतील कोस्टल रोडवरील लोटस जेट्टी ते समुद्र महालपर्यंत नवीन विहारपथ
bmc

– ‘मिसिंग लिंक’ पूर्ण करण्यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च

मुंबई (विशेष प्रतिनिधी)

मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पाअंतर्गत लोटस जेट्टी ते समुद्र महाल इमारत, वरळी दरम्यान नवीन विहारपथ उभारण्यात येत आहे. या कामामुळे प्रियदर्शनी पार्क ते वरळी सागरी सेतूपर्यंतचा सुमारे ७.५ किलोमीटर लांबीचा अखंड विहारपथ आणि सायकल ट्रॅक पूर्णत्वास जाणार आहे. या विहारपथाचे काम कोस्टल रोडसाठी नियुक्त कंत्राटदारामार्फत करण्यात आले नसून यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. याकरता सुमारे दहा कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. (BMC News)

https://prahaar.in/2026/06/02/eco-friendly-process-for-pops-immersed-idols/

मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत पुनर्प्राप्त जमिनीवर प्रियदर्शनी पार्कपासून लोटस जेट्टीपर्यंत प्रोमेनेड विकसित करण्यात आला आहे. मात्र, लोटस जेट्टी परिसरात किनारी रस्त्याच्या मार्ग रेषेमुळे हा विहारपथ खंडित होत होता. त्यानंतर बडोदा पॅलेसपासून जे. के. कपूर चौक, वरळीपर्यंत दुसरा टप्पा उपलब्ध आहे. त्यामुळे लोटस जेट्टी ते बडोदा पॅलेस हा भाग ‘मिसिंग लिंक’ म्हणून ओळखला जात असून त्याची जोडणी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. (BMC News)

महापालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मूळ निविदा आराखड्यात या जोडणीचा समावेश नव्हता. तसेच समुद्र महाल इमारतीलगत प्रस्तावित पोलिस चौकी, अग्निशमन दलाची सुविधा आणि लँडस्केप क्षेत्राला डॉ. अॅनी बेझंट रोडवरून थेट प्रवेश उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र रस्ता आवश्यक आहे. (BMC News)

या प्रकल्पामुळे समुद्र महाल, पुनम चेंबर्स, शिवसागर इस्टेट, लोटस आणि लाला लजपतराय कॉलनी परिसरातील रहिवाशांना किनारी विहारपथावर थेट प्रवेश मिळणार आहे. तसेच पोलिस गस्त, आपत्कालीन सेवा आणि अग्निशमन वाहनांसाठीही आवश्यक दळणवळण मार्ग उपलब्ध होणार आहे. (BMC News)

https://prahaar.in/2026/06/02/identity-cards-to-be-issued-to-registered-hawkers-from-june-10th-deputy-mayor-sanjay-ghadi-shiv-sena-leader-sanjay-nirupam-meet-commissioner-regarding-hawkers/

मान्सूनपूर्व काळात सार्वजनिक वापरासाठी अखंड विहारपथ उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असून ९.६४ कोटी रुपये खर्चाच्या तुलनेत साडेतीन टक्के अधिक दराने सुमारे १० कोटी रुपयांच्या कंत्राट कामांची बोली लावलण्यात आली आहे. या कामासाठी फॉरकॉन इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची निवड करण्यात आली आहे.हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई किनारी रस्त्यावरील विहारपथ आणि सायकल ट्रॅकची सलगता राखली जाईल आणि नागरिकांना प्रियदर्शनी पार्कपासून वरळी सागरी सेतूपर्यंत अखंड सार्वजनिक प्रवेश उपलब्ध होईल. या कामाकरता सागरी तटीय नियमन क्षेत्र नियुक्त सल्लागार बिल्डिंग इन्व्हॉयरोमेंट यांच्या मार्फत सीआरझेडचे प्रमाणपत्र महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (एमसीझेएमए)कडून प्राप्त करण्यात आले आहे. तसेच केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्र (सीडब्ल्यूपीआरएस) यांच्याकडून या कामासाठी संरचना अहवाल प्राप्त झाला आहे. (BMC News)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here