Crude oil prices hit record highs : जागतिक स्तरावर महागाईने डोके वर काढले आहे. अमेरिका आणि इराण (America and Iran) यांच्या धोरणामुळे जागतिक स्तरावर मोठ्या हालचाली घडत आहे. आता पुन्हा एकदा जागतिक घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. अमेरिका-इराण तणावाचा थेट परिणाम तेल पुरवठ्यावर होत आहे , त्यामुळे बाजारात देखील तेजी आली आहे.
कच्च्या तेलाच्या किंमतींनी विक्रमी टप्पा गाठला असून कच्च्या तेलाची (crude oil) प्रति बॅरल किंमत 93 डॉलरवर पोहोचली आहे. म्हणजेच कच्च्या तेलाच्या किंमतीत 2 टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या भयंकर हल्ल्यामुळे या किंमती वधारल्या आहेत. या तणावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
https://prahaar.in/2026/06/01/arun-lakhani-bjp-nominates-arun-lakhani-mp-supriya-sules-husband-for-legislative-council-sparks-debate-in-political-circles/
कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याचे कारण
आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती सुरुवातीपासून वाढण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता कराराबाबत वाढती अनिश्चितता. तेहरान अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहे, ते होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण आणि अण्वस्त्रांशी संबंधित संरक्षणाची मागणी करीत आहेत. अमेरिका या दोन्ही मागण्या सातत्याने फेटाळून लावत आहे. वॉशिंग्टनने यापूर्वीच सांगितले आहे की, प्रमुख जलमार्गांवरील जहाजांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणे योग्य नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे की, जो करार वाईट करार म्हणून वर्णन केला जाईल तो आपण स्वीकारणार नाही.
दरम्यान या सर्व परिस्थितीमुळे पश्चिम आशियात पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसत आहे, ज्याचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे सरकारी तेल कंपन्या आणि भारत सरकार आधीच आर्थिक ओझ्याखाली दबले जात आहेत, भारताचा परकीय चलनाचा साठा कमी होत आहे आणि अशा परिस्थितीत तणाव वाढल्याने व कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा उसळल्याने भारतावर आर्थिक दबाव आणखी वाढू शकतो.