Home क्रीडा Champions League Final : पीएसजीचा युरोपियन फुटबॉलवर दबदबा

Champions League Final : पीएसजीचा युरोपियन फुटबॉलवर दबदबा

Champions League Final : पीएसजीचा युरोपियन फुटबॉलवर दबदबा
PSG

आर्सेनलचा पाडाव करत सलग दुसऱ्यांदा कोरले जेतेपदावर नाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :

पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) संघाने युरोपियन फुटबॉलमध्ये नवा इतिहास रचत आर्सेनल एफसीला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ ने पराभूत करून सलग दुसऱ्यांदा यूईएफए चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद पटकावले.

https://prahaar.in/2026/06/01/not-angry-with-parth-pawar-sunil-tatkare/

हंगेरीतील पुस्कास अरेना येथे झालेल्या अंतिम सामन्यात निर्धारित आणि अतिरिक्त वेळेनंतर सामना १-१ असा बरोबरीत राहिला. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये आर्सेनलचा बचावपटू गेब्रियल मॅगल्हाएस निर्णायक पेनल्टीवर अपयशी ठरला आणि पीएसजीच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

https://prahaar.in/2026/06/01/time-flies-just-minutes-after-the-wedding-indian-origin-groom-dies-in-helicopter-crash-he-took-his-last-breath-in-front-of-his-brides-eyes/

सामन्याच्या पहिल्या सत्रात काय हावर्ट्झ याच्या गोलमुळे आर्सेनलने आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सत्रात ख्विचा क्वारात्स्खेलिया याच्यावर झालेल्या फाऊलनंतर मिळालेल्या पेनल्टीवर उस्मान डेंबेले याने गोल करत पीएसजीला बरोबरी साधून दिली.

अतिरिक्त वेळेतही निकाल न लागल्याने सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेला. अखेरीस पीएसजीने अचूक फटके मारत विजय मिळवला आणि स्पर्धेचे सलग दुसरे जेतेपद आपल्या नावावर केले.या विजयासह पीएसजी हा १९९२ नंतरच्या चॅम्पियन्स लीग युगात सलग दोन वेळा विजेतेपद जिंकणारा रिअल माद्रिद नंतरचा केवळ दुसरा क्लब ठरला.

https://prahaar.in/2026/06/01/badminton-competition-a-crown-of-honor-in-thanes-crown/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here