Home ब्रेकिंग न्यूज Big Action on Gutkha Mafia : गुटखा माफियांवर तुकाराम मुंढेंचा मोठा प्रहार! एका दिवसात ३३ जण अटकेत, २८ आस्थापना सील

Big Action on Gutkha Mafia : गुटखा माफियांवर तुकाराम मुंढेंचा मोठा प्रहार! एका दिवसात ३३ जण अटकेत, २८ आस्थापना सील

0
Big Action on Gutkha Mafia : गुटखा माफियांवर तुकाराम मुंढेंचा मोठा प्रहार! एका दिवसात ३३ जण अटकेत, २८ आस्थापना सील
tukaram munde

मुंबई : प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या अवैध विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभरात मोठी मोहीम हाती घेतली असून, एका दिवसात तब्बल ३३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच २८ आस्थापनांवर कारवाई करत ती सील करण्यात आली असून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच ही धडक मोहीम सुरू केली आहे. (Big Action on Gutkha Mafia)

राज्यभर एकाच दिवशी मोठी कारवाई :

२९ मे २०२६ रोजी बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये एकाच वेळी धाडसत्र राबवण्यात आले. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि नियमबाह्य खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. (Big Action on Gutkha Mafia)

https://prahaar.in/2026/05/30/mumbai-mandwa-ro-ro-service-regular-during-monsoon-for-passengers/

कारवाईचा तपशील असा :

बृहन्मुंबई : २ ठिकाणी कारवाई, २ जण अटकेत
कोकण विभाग : २० आस्थापनांवर कारवाई, २१ जण अटकेत
पुणे : ८ ठिकाणी धाड, ८ आरोपी अटकेत
नाशिक : १ कारवाई, १ जण अटकेत
छत्रपती संभाजीनगर : १ कारवाई, १ आरोपी अटकेत

या सर्व कारवायांमध्ये ६ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्हे दाखल; कठोर कायदेशीर कारवाई :

या प्रकरणात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आणि FDA अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवून आरोपींना ताब्यात घेतले. (Big Action on Gutkha Mafia)

तक्रारींसाठी येणार नवे अॅप आणि टोल-फ्री क्रमांक :

नागरिकांना भेसळयुक्त किंवा संशयास्पद खाद्यपदार्थांबाबत तक्रार करता यावी यासाठी FDA कडून लवकरच विशेष मोबाईल अॅप सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय तक्रारींसाठी टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामुळे नागरिकांना थेट प्रशासनाशी संपर्क साधणे अधिक सोपे होणार आहे. (Big Action on Gutkha Mafia)

https://prahaar.in/2026/05/30/sandstorm-wreaks-havoc-in-rajasthan-darkness-in-broad-daylight-dust-storm-at-a-speed-of-70-kmph-traffic-disrupted/

‘आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही’ :

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देताना म्हटले आहे की, नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. प्रतिबंधित पदार्थांची विक्री, उत्पादन किंवा भेसळ आढळल्यास यापुढे आणखी कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. (Big Action on Gutkha Mafia)

नागरिकांना आवाहन :

अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका आल्यास नागरिकांनी तातडीने अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवावी. तक्रार करताना संबंधित ठिकाणाचा पत्ता, संशयित पदार्थाची माहिती आणि संपर्क तपशील देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Big Action on Gutkha Mafia)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here