Home ब्रेकिंग न्यूज Mumbai – Mandwa Ro-Ro Service : मुंबई – मांडवा प्रवाशांसाठी पावसाळ्यातही रो-रो सेवा नियमित

Mumbai – Mandwa Ro-Ro Service : मुंबई – मांडवा प्रवाशांसाठी पावसाळ्यातही रो-रो सेवा नियमित

0
Mumbai – Mandwa Ro-Ro Service : मुंबई – मांडवा प्रवाशांसाठी पावसाळ्यातही रो-रो सेवा नियमित
Mumbai - Mandwa Ro-Ro Service

मुंबई : पावसाळ्यात मुंबई–मांडवा रो-रो सेवा (Mumbai – Mandwa Ro-Ro Service) कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावी यासाठी मांडवा बंदरातील गाळ काढण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. बंदरात साचलेल्या सुमारे ६६ हजार घनमीटर गाळाच्या उपशासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असून, त्यामुळे रो-रो आणि प्रवासी जलवाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होणार आहे.

मुंबई–मांडवा मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षांत बंदरात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने रो-रो बोटींना आणि प्रवासी जहाजांना बंदरात प्रवेश करताना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे अनेकदा रो-रो सेवेचे वेळापत्रक विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. (Mumbai – Mandwa Ro-Ro Service)

https://prahaar.in/2026/05/30/mumbai-crime-news-pawai-four-year-old-boy-who-cried-for-milk-was-killed-by-his-father/

मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांपासून बंदरातील गाळ काढण्यात आलेला नव्हता. त्यामुळे बंदरातील पाण्याची खोली कमी होत चालली होती. विशेषतः ब्रेक वॉटर बंधाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्या भागात उच्च क्षमतेची ड्रेजिंग यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. (Mumbai – Mandwa Ro-Ro Service)

मांडवा बंदरातील गाळ काढण्याच्या आणि रो-रो वाहतुकीसाठी आवश्यक विविध कामांवर आतापर्यंत सुमारे २०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. चालू आर्थिक वर्षातही गाळ उपसा व डागडुजीसाठी एप्रिलमध्ये १ कोटी ६० लाख रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली. या निधीतून सुरू असलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. (Mumbai – Mandwa Ro-Ro Service)

https://prahaar.in/2026/05/30/sandstorm-wreaks-havoc-in-rajasthan-darkness-in-broad-daylight-dust-storm-at-a-speed-of-70-kmph-traffic-disrupted/

२६ मेपासून मान्सूनमुळे नियमित सागरी प्रवासी जलवाहतूक बंद राहणार असली तरी मुंबई–मांडवा रो-रो सेवा सुरूच राहणार आहे. त्यामुळे मुंबई आणि रायगड दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पावसाळ्यातही अखंडित सेवा मिळणार आहे. (Mumbai – Mandwa Ro-Ro Service)