Home महाराष्ट्र नाशिक Nashik Crime News : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! मैत्री करण्यास नकार दिल्याचा राग; तरुणीसह सहा मैत्रिणींचा विनयभंग, आरोपी अटकेत

Nashik Crime News : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! मैत्री करण्यास नकार दिल्याचा राग; तरुणीसह सहा मैत्रिणींचा विनयभंग, आरोपी अटकेत

0
Nashik Crime News : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! मैत्री करण्यास नकार दिल्याचा राग; तरुणीसह सहा मैत्रिणींचा विनयभंग, आरोपी अटकेत
Nashik Molestation Case

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) महिलांच्या सुरक्षेचा (Women Safety) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मैत्री करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका तरुणाने तरुणीसह तिच्या सहा मैत्रिणींना जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्यांच्याशी अश्लील वर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर आरोपीने मुलींना जीवे मारण्याची धमकी देत चाकूचा धाक दाखवल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणामुळे नाशिक शहरात मोठी खळबळ उडाली असून आडगाव पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि तिच्या सहा मैत्रिणी नांदूर जत्रा लिंक रोड परिसरातून जात असताना आरोपी दानिश सय्यद याने त्यांचा रस्ता अडवला. यावेळी त्याने एका तरुणीला “मैत्री करणार का?” असा प्रश्न विचारला. मात्र संबंधित तरुणीने स्पष्टपणे नकार दिला. या नकारामुळे संतप्त झालेल्या आरोपीने सर्व मुलींना जबरदस्तीने आपल्या कारमध्ये बसण्यास भाग पाडले, असा आरोप करण्यात आला आहे.

https://prahaar.in/2026/05/30/six-people-brutally-murdered-over-25-acres-of-land-dispute-times-attack-on-nirale-family-famous-for-khillar-bulls/

यानंतर आरोपीने कार भरधाव वेगाने चालवत मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. गाडीत असतानाच त्याने मुलींसोबत अश्लील वर्तन केल्याचा तसेच त्यांचा विनयभंग (Molestation) केल्याचा आरोप पीडितांनी आपल्या तक्रारीत केला आहे. आरोपीच्या या कृत्यामुळे सर्व मुली प्रचंड घाबरल्या होत्या.

तक्रारीनुसार, आरोपीने केवळ अश्लील वर्तनच केले नाही, तर “आज तुम्हाला कापून टाकतो” अशी धमकी देत मुलींमध्ये दहशत निर्माण केली. काही अंतर पुढे गेल्यानंतर मुलींनी गाडीतून खाली उतरण्यात यश मिळवले. मात्र त्यानंतरही आरोपी त्यांचा पाठलाग करत राहिला. यावेळी त्याने पुन्हा चाकूचा धाक दाखवत धमकावल्याचे मुलींनी पोलिसांना सांगितले आहे.

https://prahaar.in/2026/05/30/new-cng-rates-announced-in-mumbai-a-blow-to-vehicle-owners-pockets/

घटनेनंतर पीडित तरुणींनी तत्काळ आडगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला आणि आरोपी दानिश सय्यद याचा शोध घेत त्याला अटक (Arrest) केली. या घटनेमुळे नाशिकमध्ये संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here