Home क्रीडा Grandmaster Rameshbabu Praggnanandhaa : ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदने कार्लसनला हरवले !

Grandmaster Rameshbabu Praggnanandhaa : ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदने कार्लसनला हरवले !

Grandmaster Rameshbabu Praggnanandhaa : ग्रँडमास्टर प्रज्ञानानंदने कार्लसनला हरवले !
Grandmaster Praggnanandhaa

स्टाव्हेंगर (वृत्तसंस्था):
भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानानंदने जगातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनचा पराभव करत नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शांत, संयमी आणि अचूक डावपेचांच्या जोरावर प्रज्ञानानंदने संपूर्ण सामन्यात कार्लसनवर दबाव कायम ठेवला.

https://prahaar.in/2026/05/29/25000-workers-including-former-mla-vinayakrao-patil-join-shiv-sena/

वेळेच्या तणावपूर्ण टप्प्यात कार्लसनने पुनरागमन करत काही काळ आघाडी मिळवली होती. मात्र निर्णायक क्षणी त्याच्याकडून झालेल्या गंभीर चुकीचा प्रज्ञानानंदाने अचूक फायदा घेतला. हा विजय प्रज्ञानानंदच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या यशांपैकी एक मानला जात आहे. विजयानंतर प्रज्ञानानंदने सामाजिक माध्यमावर प्रतिक्रिया देताना, “मॅग्नसविरुद्ध अतिशय संघर्षपूर्ण सामना खेळता आला याचा आनंद आहे. दुसऱ्या महत्त्वाच्या सामन्यात विद्यमान विश्वविजेता डी. गुकेश आणि स्पर्धेतील आघाडीवर असलेला अलीरेझा फिरुझा यांच्यातील पारंपरिक सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर झालेल्या निर्णायक जलद फेरीत फिरुझाने विजय मिळवत अतिरिक्त गुण पटकावले आणि गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले.

https://prahaar.in/2026/05/29/a-speeding-kia-car-met-with-a-horrific-accident-in-mulund-a-vegetable-vendor-woman-died-on-the-spot-two-others-were-seriously-injured/

व्हिन्सेंट कीमर आणि वेस्ली सो यांच्यातील सामनाही अनिर्णित राहिला.

महिला विभागातही सर्व सामने अनिर्णित राहिल्यानंतर जलद निर्णायक फेऱ्यांमध्ये निकाल लागले. महिला विश्वविजेती जु वेनजुन आणि झू जिनर यांच्यात रंगलेल्या सामन्यात झूने सुरुवातीची आघाडी गमावली होती. मात्र नंतरच्या निर्णायक फेरीत तिने विजय मिळवत अतिरिक्त गुण मिळवले.

https://prahaar.in/2026/05/28/important-news-konkan-railway-monsoon-schedule-announced-big-change-in-travel-from-june-15/