नवी दिल्ली : हरित आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या दिशेने भारताने मोठे पाऊल टाकले असून, देशातील पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणारी रेल्वेगाडी लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. भारतीय रेल्वेने उत्तर भारतातील जिंद-सोनीपत या मार्गावर 10 डब्यांच्या हायड्रोजन रेल्वेला परिचालनासाठी मंजुरी दिली आहे. (First Indigenous Hydrogen Train)
https://prahaar.in/2026/05/28/pm-narendra-modi-prime-minister-modis-appeal-to-minister-adopt-carpooling-to-save-fuel-emphasis-on-discipline-and-eco-friendly-practices-in-administration/
या प्रकल्पामुळे भारताने जर्मनी, जपान, चीन आणि अमेरिका यांसारख्या प्रगत देशांच्या यादीत स्थान मिळवले आहे. हायड्रोजन-आधारित रेल्वे प्रणाली अजूनही जागतिक स्तरावर प्रारंभिक टप्प्यात असून, अत्यंत कमी देशांकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेचा हा प्रयोग देशाच्या तांत्रिक प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. (First Indigenous Hydrogen Train)
हरियाणातील जिंद-सोनीपत मार्ग हा या प्रकल्पासाठी प्रायोगिक मार्ग म्हणून निवडण्यात आला आहे. जिंद येथे स्वदेशी हायड्रोजन साठवण आणि इंधन पुनर्भरण सुविधा उभारण्यात आली असून, पेट्रोलियम आणि स्फोटक पदार्थ सुरक्षा संघटनेने (PESO) त्यासाठी आवश्यक परवानग्या दिल्या आहेत. (First Indigenous Hydrogen Train)
https://prahaar.in/2026/05/28/twisha-sharma-case-big-action-after-7-hours-of-interrogation-mother-in-law-giribala-singh-arrested-cbi-investigation-in-full-swing/
या रेल्वेच्या परिचालनासाठी कठोर सुरक्षा नियम लागू करण्यात आले आहेत. हायड्रोजन इंधन प्रणालीचे 24 तास निरीक्षण, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती, नियमित तपासणी आणि देखभाल यांना प्राधान्य दिले जाणार आहे. (First Indigenous Hydrogen Train)