Home महाराष्ट्र अहिल्यानगर Ahilyanagar : एक नाही तर तब्बल ५५ अल्पवयीन मुली झाल्या गरोदर . . . नक्की काय आहे प्रकरण ?

Ahilyanagar : एक नाही तर तब्बल ५५ अल्पवयीन मुली झाल्या गरोदर . . . नक्की काय आहे प्रकरण ?

0
Ahilyanagar : एक नाही तर तब्बल ५५ अल्पवयीन मुली झाल्या गरोदर  . .  . नक्की काय आहे प्रकरण ?
pregnancya

अकोले : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या सर्वेक्षणात तालुक्यात ५५ अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील काही मुलींची प्रसूती देखील झाल्याचं समोर आले. कोले आणि राजूर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांकडून दरमहा गरोदर आणि स्तनदा मातांचे सर्वेक्षण केलं जातं. या सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती सरकारी यंत्रणेला मिळाली आहे. केंद्र सरकारच्या ‘मातृत्व वंदना योजने’चा लाभ घेण्यासाठी आलेल्या अर्जांमध्येही या अल्पवयीन मुलींची नावं आढळल्यानं प्रशासनाला जाग आली आहे.

https://prahaar.in/2026/05/27/corporate-jihad-in-tcs-nashik-bank-jihad-in-mumbai-shocking-incident-in-nariman-point-branch/

सामाजिक दबाव, बदनामीची भीती आणि कायदेशीर कारवाईच्या धाकामुळे अनेक बालविवाहांची नोंदच होत नाही. मुली पळून जाऊन लग्न करतील या भीतीने अनेक पालक अल्पवयातच मुलींचे लग्न लावून देत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षातील गरोदर अल्पवयीन मुलींची संख्या यापेक्षा कितीतरी अधिक असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगाने सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरीय बाल संरक्षण समित्या सक्रिय करणे, लग्नाच्या वेळी वधू-वरांचे जन्मदाखले सक्तीचे करणे आणि अल्पवयीन मुलींशी विवाह करणाऱ्यांवर थेट फौजदारी गुन्हे नोंदवणे आवश्यक आहे, अशीही मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here