– जागतिक इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
मुंबई : जागतिक पातळीवर जाणवणाऱ्या इंधन तुटवड्याची झळ एसटी महामंडळाला बसू नये आणि वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी राज्यभरात ‘इंधन बचत… म्हणजेच इंधन निर्मिती’ ही व्यापक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. एसटी महामंडळाचा दैनंदिन खर्च कमी करण्यासाठी आता प्रत्येक आगारनिहाय डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित केले जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी मंगळवारी दिली. (Diesel Saving in ST)
https://prahaar.in/2026/05/26/indias-new-era-of-immortality-is-coming-under-the-leadership-of-prime-minister-modi/
https://prahaar.in/2026/05/26/neet-paper-leak-case-big-update-in-paper-leak-case-cbi-charges-three-teachers-question-leak-scam-worth-lakhs-exposed/
वाहन चालविण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे ज्या चालकांच्या बसचे के.पी.एल. (किलोमीटर प्रति लिटर) प्रमाण कमी भरते, अशा चालकांचे समुपदेशन करून त्यांना पुनर्प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वेग नियंत्रण, योग्य गिअरचा वापर, विनाकारण इंजिन सुरू न ठेवणे आणि सर्वोत्तम ब्रेकिंग पद्धती या तांत्रिक बाबींचे विशेष प्रशिक्षण चालकांना दिले जाईल. (Diesel Saving in ST)
https://prahaar.in/2026/05/26/legislative-council-election-ravindra-phatak-or-kshitij-thakur-for-thane-legislative-council/
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन भत्ता :
https://prahaar.in/2026/05/26/bakri-eid-2026-tension-in-mira-road-before-bakri-eid-dispute-over-keeping-goats-in-society-direct-blade-attack-on-youth/
कार्यशाळांना तांत्रिक तपासणीचे आदेश :
गाड्यांच्या देखभालीकडेही महामंडळाकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे. टायरमधील हवेचा दाब (टायर प्रेशर), इंजिन ट्युनिंग, ऑईल गळती आणि ब्रेक प्रणाली यांमधील त्रुटींमुळे इंधनाचा अपव्यय होतो. त्यामुळे बसेसची दैनंदिन तांत्रिक तपासणी आणि वेळेवर दुरुस्ती करण्याचे आदेश कार्यशाळांना देण्यात आले आहेत. (Diesel Saving in ST)