- रिक्षा-टॅक्सी भाडे वाढण्याची शक्यता
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांनी आधीच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता सीएनजीच्या किमतींनीही नागरिकांची चिंता वाढवली आहे. एकेकाळी स्वस्त आणि परवडणारे इंधन मानल्या जाणाऱ्या सीएनजीच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. मंगळवार, २६ मेपासून नवीन दर लागू झाले असून सीएनजी प्रति किलो तब्बल २ रुपयांनी महागला आहे. (CNG Prices Hike)
पुणे : पुणे शहरात आजपासून जमावबंदी लागू झाल्याच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. आंदोलन, मोर्चे आणि सभांवर बंदी ...
१५ दिवसांत चौथ्यांदा दरवाढ :
विशेष म्हणजे १५ मेपासून आतापर्यंत सीएनजीच्या दरात चार वेळा वाढ करण्यात आली आहे. अवघ्या दहा दिवसांत दिल्लीत सीएनजी तब्बल ६ रुपयांनी महागला आहे. १५ मे रोजी दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली होती आणि त्यानंतर सातत्याने दरवाढ सुरूच आहे. (CNG Prices Hike)
या सततच्या दरवाढीमुळे वाहनचालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. विशेषतः रिक्षा, टॅक्सी आणि कॅब चालकांवर याचा मोठा परिणाम होत असून त्यांच्या उत्पन्नावर ताण वाढला आहे. (CNG Prices Hike)
रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ अटळ?
जर भाडेवाढ लागू झाली तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना आता रोजच्या प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात. (CNG Prices Hike)
मुंबई : मुंबईतील रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेने आता मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली असून, वांद्रे पूर्वेतील कारवाईनंतर ...
सीएनजी महागण्यामागे नेमके कारण काय?
गॅस वितरण कंपनी Indraprastha Gas Limited (IGL) ने या दरवाढीमागे आंतरराष्ट्रीय कारणे असल्याचे स्पष्ट केले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जागतिक बाजारात नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने गॅस आयातीचा खर्च वाढला आहे. (CNG Prices Hike)
आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढता दबाव आणि आयात खर्चामुळे कंपन्यांना वारंवार दरवाढ करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे येत्या काळातही इंधन दरांबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र दिसत आहे.




