राजा शिवाजी बॉक्स ऑफिस कलेक्शन (Box Office Collection) : मराठी चित्रपटसृष्टीत २६ दिवसांपासून धुमाकूळ घालणारा ‘राजा शिवाजी’ चित्रपट आता चौथ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसत आहे. प्रदर्शनाच्या २५ व्या दिवशी म्हणजेच चौथ्या सोमवारी या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने २५ व्या दिवशी ८३८ शो मधून ०.६१ कोटींची कमाई केली. चित्रपटाने चौथ्या रविवारी १.३० कोटीची कमाई केली होती. त्यामानाने सोमवारच्या कलेक्शनमध्ये ५३.०८ टक्क्यांची घसरण झाली. पण चौथ्या आठवड्यातील वर्किंग डे पाहता ही कमाई सामान्य राहिली.
https://prahaar.in/2026/05/26/shocking-kabaddi-player-murdered-over-a-sports-dispute-shots-fired-in-the-street-9-accused-arrested/
आतापर्यंत ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने भारतात ९२.५४ कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. जगभरातील कमाईचा आकडा ११३.६० कोटी रुपयांवर गेला आहे. चौथ्या आठवड्यातील सोमवारी या चित्रपटाची १५.५१ हजार तिकिटे बुक झाली. यावरूनच या चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येतो. २५ दिवसात या चित्रपटाने बुक माय शोवर २५.२१ लाखांहून अधिक तिकिटांचा विक्रीचा टप्पा पार केला आहे. जवळपास महिन्याभरानंतरही प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आणि या चित्रपटाचं वेड कायम असल्याचं स्पष्ट होतं. पीव्हीआर (PVR), आयनॉक्स (INOX) आणि सिनेपोलीस (cinepolice) या राष्ट्रीय मल्टिप्लेक्स चेनमध्ये राजा शिवाजी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. या तिन्ही चेनमधून सुमारे २.२ हजार तिकिटांची विक्री झाली आणि ३.९ लाख रुपयांचे ग्रॉस कलेक्शन झाले आहे. आयनॉक्स (INOX) मधून २.१ लाख, सिनेपोलीसमधून १.२ लाख आणि पीव्हीआर मधून ०.६ लाख रुपयांची कमाई या चित्रपटाने केली.
https://prahaar.in/2026/05/26/raja-shivaji-movies-historic-achievement-5-big-records-in-just-25-days/
चित्रपटाच्या कमाईत मराठी आवृत्तीचा वाटा मोठा आहे. मराठी आवृत्तीतून चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या २१% होती. हा चित्रपट पुणे आणि मुंबईमध्ये सर्वाधिक पाहिला गेला. एकूण भाषावार कमाई पाहता मराठी आवृत्तीने आतापर्यंत ६७.८२ कोटींची नेट कमाई केली. तर हिंदी आवृत्तीचा वाटा २४.७२ कोटी होता. या दोन्ही भाषांमधून केलेल्या कमाईमुळे या चित्रपटाने जगभरात सहज १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.