मुंबई : मुंबईतील रेल्वेच्या जागांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी पश्चिम रेल्वेने आता मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली असून, वांद्रे पूर्वेतील कारवाईनंतर आता Goregaon आणि Malad परिसरातील झोपड्या आणि बेकायदेशीर बांधकामांवर हातोडा चालवण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू असलेल्या या कारवाईमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. (Malad-Goregaon Encroachments)
https://prahaar.in/2026/05/26/vidarbha-heat-wave-heat-wreaks-havoc-in-vidarbha-as-many-as-500-bats-die-brahmapuri-records-highest-temperature-in-the-country/
रेल्वे विस्तारासाठी जागा मोकळी :
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही जागा भविष्यात हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. मुंबईतील वाढती प्रवासी संख्या आणि रेल्वेवरील ताण लक्षात घेता रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार अत्यावश्यक बनला आहे. यामुळे रेल्वेची क्षमता वाढवणे, प्रवास अधिक सुरक्षित करणे आणि रेल्वे रुळांवरील अतिक्रमणामुळे होणारे अपघात रोखणे हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. (Malad-Goregaon Encroachments)
https://prahaar.in/2026/05/26/there-is-sufficient-fuel-stock-in-the-state-citizens-should-not-believe-in-rumors-minister-chhagan-bhujbal-appeals/
परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त :
https://prahaar.in/2026/05/26/maharashtra-vidhan-parishad-elections-2026-excitement-over-seat-sharing-in-mahayuti-bjps-moves-accelerate-to-address-shindes-displeasure/
वांद्रे पूर्वेनंतर पुन्हा मोठी मोहीम :
काही दिवसांपूर्वीच Bandra East येथील गरीबनगर परिसरातही पश्चिम रेल्वेकडून मोठी अतिक्रमणविरोधी मोहीम राबवण्यात आली होती. त्या कारवाईनंतर आता मालाड-गोरेगाव भागातील मोहीम अधिक चर्चेत आली आहे. आगामी रेल्वे प्रकल्प, ट्रॅक विस्तार आणि सुरक्षेच्या दृष्टीने अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. (Malad-Goregaon Encroachments)
दरम्यान, या कारवाईमुळे अनेक कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली असून स्थानिकांकडून पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत या विषयावर राजकीय आणि सामाजिक स्तरावरही चर्चा रंगण्याची शक्यता आहे.
View this post on Instagram