Home ब्रेकिंग न्यूज NEET Paper Leak Case : ‘गॉड’ कोण? मनीषा हवालदारच्या पतीच्या फोनमधील नंबरमुळे वाढलं गूढ!

NEET Paper Leak Case : ‘गॉड’ कोण? मनीषा हवालदारच्या पतीच्या फोनमधील नंबरमुळे वाढलं गूढ!

0
NEET Paper Leak Case : ‘गॉड’ कोण? मनीषा हवालदारच्या पतीच्या फोनमधील नंबरमुळे वाढलं गूढ!
NEET Manisha Hawaldar

लातूर : NEET पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनीषा हवालदार हिच्या अटकेनंतर तपासाचा वेग वाढला असून, आता तिच्या पतीच्या मोबाईलमधील ‘गॉड’ (God) नावाने सेव्ह केलेल्या एका संशयास्पद नंबरमुळे नवीनच गूढ निर्माण झाले आहे. या नंबरमागे नेमकं कोण आहे, याचा शोध केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) घेत आहे.

CBI च्या तपासात असे समोर आले आहे की, अटक करण्यात आलेल्या मनीषा हवालदारने NEET परीक्षेच्या तिन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका आणि प्रश्न परीक्षा होण्यापूर्वीच काही विद्यार्थी व पालकांना उपलब्ध करून दिले होते. त्याबदल्यात लाखो ते कोट्यवधी रुपयांची वसुली करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. दरम्यान, मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये ‘गॉड’ नावाने सेव्ह असलेल्या संपर्कासोबतचे काही संशयास्पद संभाषण CBI च्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या चॅटमधून पेपरफुटी रॅकेटमधील मोठी नावे आणि सूत्रधार समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

https://prahaar.in/2026/05/24/danish-sheikhs-bank-account-sealed-in-tcs-case/

NTA अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून पेपरफुटी?

तपासादरम्यान मनीषा हवालदारने राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) मधील एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून प्रश्नपत्रिका लीक केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः भौतिकशास्त्र विषयातील काही प्रश्न परीक्षा होण्यापूर्वीच संबंधित विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणात हवालदार, वाघमारे आणि मांढरे यांच्यातील संशयास्पद चॅटची माहितीही तपास यंत्रणेला मिळाली आहे. विशेष म्हणजे, अटकेपूर्वीच मनीषा हवालदारने हे चॅट डिलीट केल्याचे उघड झाले आहे. मात्र, डिजिटल पुराव्यांच्या आधारे CBI हे संदेश पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

https://prahaar.in/2026/05/25/a-young-man-was-brutally-murdered-in-beed-he-was-tied-up-with-a-rope-and-brutally-beaten/

घरातून जप्त झाले गोपनीय दस्तावेज

CBI ने मनीषा हवालदारच्या घरावर आणि कार्यालयावर टाकलेल्या छाप्यांमध्ये काही अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. तपासादरम्यान NTA चे काही गोपनीय आणि अधिकृत दस्तावेज तिने बेकायदेशीररित्या स्वतःकडे ठेवल्याचे समोर आले आहे. याशिवाय, पेपरफुटी रॅकेटमधील इतर संशयित आणि मुख्य आरोपींची ओळख पटवून देणारी महत्त्वाची कागदपत्रेही तपास यंत्रणेच्या हाती लागली आहेत. मनीषाच्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता, या घोटाळ्याशी संबंधित अनेक मोठे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचेही उघड झाले आहे.

https://prahaar.in/2026/05/25/big-update-in-twisha-sharma-case-second-postmortem-report-in-3-4-days-how-will-aiims-prepare-the-final-report/

विद्यार्थी आणि पालकही CBI च्या रडारवर

या प्रकरणात केवळ पेपरफुटी करणाऱ्यांचाच नव्हे, तर बेकायदेशीर मार्गाने परीक्षा पास होण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांचाही तपास होणार आहे. मनीषा हवालदारने ज्यांना प्रश्नपत्रिका विकल्याचा संशय आहे, अशा विद्यार्थी आणि पालकांची यादी CBI च्या हाती लागल्याची माहिती आहे. त्यामुळे या संपूर्ण गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांची चौकशी केली जाणार असून, तपासात दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई आणि अटकेची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, ‘गॉड’ (God) नावाने सेव्ह असलेल्या नंबरमागील व्यक्तीचा शोध लागल्यानंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here