Home देश मास्टर की वापरून रात्री रूममध्ये आला कर्मचारी, दांपत्याची झोप उडाली

मास्टर की वापरून रात्री रूममध्ये आला कर्मचारी, दांपत्याची झोप उडाली

0
मास्टर की वापरून रात्री रूममध्ये आला कर्मचारी, दांपत्याची झोप उडाली
goa

कोलवा : गोव्यातील कोलवा परिसरातल्या एका बड्या हॉटेलमध्ये धक्कादायक घटना घडली. पर्यटनासाठी आलेले दांपत्य हॉटेलच्या रूमवर गाढ झोपले होते. त्यावेळी विना परवानगी हॉटेलचा कर्मचारी मास्टर की वापरून थेट रूमध्येच शिरला. ही घटना २२ मे रोजी घडली.

https://prahaar.in/2026/05/25/jammu-kashmir-accident-shocking-incident-in-jammu-and-kashmir-300-tourists-found-themselves-in-trouble-after-gulmarg-gondola-stopped/

एक मराठी दांपत्य गोवा फिरण्यासाठी गेले होते. या दांपत्याने बड्या हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. रात्री बुक केलेल्या रूममध्ये दांपत्य विश्रांती घेत होते. ते गाढ झोपेत होते, त्यावेळी हॉटेलचा कर्मचारी मास्टर की वापरून थेट रूमध्येच शिरला. परवानगी न घेताच हॉटेलचा कर्मचारी रात्रीच्या वेळी रूममध्ये घुसला होता. ही धक्कादायक घटना रात्री बाराच्या सुमारास घडली. दांपत्य गाढ झोपेत होते. पण कोणीतरी रूमचे लॅच उघडत असल्याची जाणीव होताच पतीला जाग आली त्याने रूममध्ये शिरत असलेल्याला जाब विचारला. आपल्याला जाब विचारत असल्याचे लक्षात येताच रूममध्ये घसणाऱ्याने दरवाजातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पतीने लगेच दरवाजाजवळ तिथे कोण होते ते तपासले. त्यावेळी हॉटेलचा कर्मचारीच रूममध्ये घुसखोरी करत असल्याचे त्याच्या लक्षात आले.

https://prahaar.in/2026/05/25/maharashtra-state-jawahar-bal-bhavans-renovated-building-inaugurated-by-cm-devendra-fadnavis/

पतीने हॉटेलच्या कर्मचाऱ्याला तू इथे का आलास आणि काय करत होतास असा सवाल केला. त्यावेळी एक कॉल आला आणि या रूमचा एसी चालत नसल्याची तक्रार आली म्हणून आलो असे अनाकलनीय कारण कर्मचाऱ्याने दिले. पण कॉल केलाच नव्हता असे सांगितल्यावर कर्मचारी घाबरला. अखेर कर्मचाऱ्याला हॉटेल मॅनेजरकडे नेण्यात आले त्यावेळी अतिरिक्त बेडची मागणी आली म्हणून कर्मचारी त्या रूमच्या दिशेने गेला असे मॅनेजरने सांगितले. पण मास्टर की चा वापर झाल्याचे त्यालाही माहिती नव्हते, असे त्याचे म्हणणे होते. या प्रकरणी आता पोलिसांत तक्रार झाली असून तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here