Home ताज्या घडामोडी Actress Karishma Tanna Babyshower : प्रसिद्ध अभिनेत्रीने केले दाक्षिणात्य पद्धतीने डोहाळेजेवण

Actress Karishma Tanna Babyshower : प्रसिद्ध अभिनेत्रीने केले दाक्षिणात्य पद्धतीने डोहाळेजेवण

0
Actress Karishma Tanna Babyshower : प्रसिद्ध अभिनेत्रीने केले दाक्षिणात्य पद्धतीने डोहाळेजेवण
Karishma Tanna & Varun Bangera

टीव्ही विश्वातली नावाजलेली अभिनेत्री करिष्मा तन्ना आणि तिचा नवरा वरूण लवकरच आई बाबा होणार आहेत. नुकताच करिष्मा तन्नाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम थाटात झाला. दाक्षिणात्य पद्धतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कुटुंबियांनी करिष्मा तन्ना आणि वरूणला भावी आयुष्यासाठी आशीर्वाद दिले. या सोहळ्याचे निवडक फोटो करिष्मा आणि वरूणने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये करिष्मा आणि वरूण प्रचंड आनंदात दिसत आहेत.

https://prahaar.in/2026/05/25/nashik-crime-shocking-revelation-about-the-suspected-accused-in-the-liquor-party/

दाक्षिणात्य पद्धतीच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी करिष्मा तन्नाने परंपरागत दाक्षिणात्य पोशाख केला होता. ती अतिशय सुंदर दिसत होती. करिष्माच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. वरुणनेही तिच्यासोबत मॅच करेल असा सुंदर पोशाख केला होता. दोघांचे दाक्षिणात्य पोशाखातले फोटो व्हायरल होत आहेत. करिष्मा तन्नाच्या डोहाळे जेवणाचे ठिकाण सुंदर फुलांनी सजवले होते. या ठिकाणाचेही फोटो व्हायरल होत आहेत.

https://prahaar.in/2026/05/25/maharashtra-state-jawahar-bal-bhavans-renovated-building-inaugurated-by-cm-devendra-fadnavis/

करिष्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांचा विवाह फेब्रुवारी २०२२ रोजी झाला. लग्नाला चार वर्षे झाल्यानंतर २०२६ मध्ये त्यांनी आई बाबा होणार असल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. आई (mom)आणि बाबा (dad) असं लिहिलेल्या आकर्ष टोप्या परिधान करून करिष्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांनी फोटो शेअर केला होता. करिष्मा प्रेग्नंट असल्याची घोषणा दांपत्याने सोशल मीडियावरून केली होती. मिळालेल्या माहितीनुसार करिष्मा – वरूण या दांपत्याच्या घरी ऑगस्ट २०२६ मध्ये चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सध्या करिष्माच्या डोहाळे जेवणाचीच सोशल मीडियात प्रचंड चर्चा आहे.

https://prahaar.in/2026/05/25/idris-nayakwadi-should-resign-sunetra-pawars-suggestion/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here