Home महाराष्ट्र ठाणे Dombivli News : डोंबिवलीतील लोढा पलावा क्राऊन सिटीत पोलिसांचा छापा; २५ आफ्रिकन नागरिक ताब्यात

Dombivli News : डोंबिवलीतील लोढा पलावा क्राऊन सिटीत पोलिसांचा छापा; २५ आफ्रिकन नागरिक ताब्यात

0
Dombivli News : डोंबिवलीतील लोढा पलावा क्राऊन सिटीत पोलिसांचा छापा; २५ आफ्रिकन नागरिक ताब्यात
Lodha Palava City

डोंबिवली : नवी मुंबई (Navi Mumbai) आणि ठाणे (Thane) पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या ‘ऑपरेशन गरुड ३’ अंतर्गत शनिवारी पहाटे डोंबिवलीतील पलावा सिटी आणि खोणी गाव परिसरात मोठी धडक कारवाई केली. या कारवाईदरम्यान १६ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकत २५ आफ्रिकन (African) नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या या सोसायटीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने परदेशी नागरिक आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

https://prahaar.in/2026/05/24/neet-2026-paper-leak-case-manisha-hawaldar/

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये परदेशी ड्रग्ज तस्करी करणारे अनेक जण राहत असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर पोलिसांनी नवी मुंबईसह विविध भागांमध्ये शोधमोहीम सुरू केली होती. या तपासादरम्यान डोंबिवलीतील (Dombivli) शहरापासून काहीसे दूर असलेल्या आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या लोढा पलावा क्राऊन सिटी परिसरात संशयित परदेशी नागरिक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी अत्यंत गुप्तता राखत मोठी संयुक्त कारवाई केली. कारवाईदरम्यान तब्बल २५ आफ्रिकन नागरिक या सोसायटीमध्ये मागील काही दिवसांपासून राहत असल्याचे समोर आले. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये १४ पुरुष, ७ महिला आणि ४ बालकांचा समावेश आहे. या विशेष मोहिमेसाठी २५ पोलीस अधिकारी आणि १०० अंमलदारांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

https://prahaar.in/2026/05/24/pbks-vs-lsg-ipl-2026/

दरम्यान, १९ मे रोजी वाशीतील जुहूगाव येथे नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन नायजेरियन नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून १ कोटी २६ लाख २५ हजार रुपये किमतीचे २५२.५ ग्रॅम उच्च दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले होते. या कारवाईनंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली होती.

मुख्य आरोपी अटकेत

या प्रकरणाच्या तपासादरम्यान मुख्य आरोपी डोंबिवलीतील पलावा सिटी परिसरात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने संयुक्त कारवाई करत पॉल चिग्बाटा ओनुओच (वय ३४) या मुख्य आरोपीला ताब्यात घेतले. याशिवाय ताब्यात घेतलेल्या इतर संशयितांची मानपाडा पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्यांच्या कागदपत्रांची आणि वास्तव्याच्या वैधतेची सखोल पडताळणी केली जात आहे.

https://prahaar.in/2026/05/24/power-cut-between-khadavli-titwala-due-to-morning-rain-central-railway-traffic-was-disrupted-trains-started-after-6-am/

मोठं रॅकेट असल्याचा संशय

बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी दिली. या संपूर्ण कारवाईमुळे ड्रग्ज रॅकेटमध्ये मोठी खळबळ उडाली असून यामागे आणखी मोठे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे जाळे कार्यरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपास पुढे सरकल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here