– सुशील परब
मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएल २०२६ मधील ६९वा सामना आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियम येथे आहे. राजस्थान रॉयल्ससाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी विजय अत्यावश्यक आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान आधीच संपुष्टात आले असल्याने हा त्यांचा अखेरचा लीग सामना ठरणार आहे.
https://prahaar.in/2026/05/24/ipl-2026-arjun-tendulkar-sachin-tendulkars-emotional-post-for-arjun/
आयपीएल २०२६ ची प्लेऑफ शर्यत सध्या अत्यंत रोमांचक टप्प्यावर पोहोचली आहे. तीन संघांनी आपले स्थान जवळपास निश्चित केले असून उर्वरित जागेसाठी चुरस वाढली आहे. राजस्थान रॉयल्ससाठी सर्वात मोठा आशेचा किरण म्हणजे युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. या हंगामात त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने अनेक दिग्गज गोलंदाजांना धूळ चारली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजस्थानच्या चाहत्यांच्या आशा त्याच्यावर टिकून आहेत. जर वैभवने पुन्हा एकदा मोठी खेळी केली, तर राजस्थान रॉयल्स प्लेऑफकडे मोठे पाऊल टाकू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे फलंदाजीत यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा यांच्यावर संघाची मोठी जबाबदारी असेल, तर गोलंदाजीत जोफ्रा आर्चर, दासुन शनाका आणि यशराज यांच्याकडून प्रभावी कामगिरीची अपेक्षा असेल.
https://prahaar.in/2026/05/24/ipl-2026-mi-vs-rr-do-or-die-for-rajasthan-punjabs-playoff-dreams-depend-on-todays-match/
याच्या उलट मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि जॅक यांसारखे स्टार फलंदाज असूनही या हंगामात अपेक्षेप्रमाणे चमकू शकली नाही. १३ सामन्यांत केवळ ४ विजय मिळवत मुंबईचा संघ स्पर्धेबाहेर गेला. यामुळे आता सर्वांच्या नजरा या निर्णायक सामन्याकडे लागल्या आहेत. राजस्थान रॉयल्स विजय मिळवत अंतिम चारमध्ये धडक मारणार का, की मुंबई इंडियन्स त्यांचा मार्ग रोखणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.