मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज म्हणजेच रविवार २४ मे रोजी अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाल्याने राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. दिल्लीमध्ये ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असून, या बैठकीत महायुतीतील विधान परिषद निवडणुकीच्या जागावाटपासह अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
https://prahaar.in/2026/05/24/monsoon-2026-important-news-for-farmers-avoid-sowing-until-75-to-100-mm-of-rain-agricultural-university-warns/
विशेष म्हणजे, शिंदे (Eknath Shinde) गटाने विधान परिषदेच्या ६ जागांची मागणी केली असल्याचे सांगितले जात आहे. मात्र भाजपकडून केवळ ४ जागांवर सहमती दर्शवण्यात आल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट दिल्ली गाठत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
https://prahaar.in/2026/05/24/ebola-disease-central-government-advises-citizens-in-the-wake-of-ebola-avoid-travel-to-congo-uganda-and-south-sudan/
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी सकाळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना, “सध्या ज्या पक्षाकडे जागा आहे ती त्याच पक्षाला देण्याचा विचार सुरू आहे. त्यानंतर संख्याबळाच्या आधारे निर्णय घेतला जाईल,” असे सांगितले होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही हाच फॉर्म्युला वापरण्यात आला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, शिंदे (Eknath Shinde) यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे आता विधान परिषद जागावाटपाचा अंतिम निर्णय राज्यात नव्हे तर दिल्ली दरबारातच होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महायुतीतील राजकीय समीकरणांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. (Eknath Shinde)