Home क्राईम Ulhasnagar : उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात गोळीबार

Ulhasnagar : उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात गोळीबार

0
Ulhasnagar : उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात गोळीबार

उल्हासनगर : शहरातील कैलास कॉलनी चौक परिसरात गुरुवारी रात्री अचानक झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. दोन गटांतील जुन्या वैमनस्यातून भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार करण्यात आल्याने एक व्यक्ती ठार झाल्या असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेत तब्बल ७ फैरी झाडण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

https://prahaar.in/2026/05/21/schedule-for-various-upsc-examinations-announced/

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कैलास कॉलनी चौकात अरुण चौहान आणि अर्जुन चौहान यांच्यावर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. काही कळण्याच्या आतच हल्लेखोरांनी बंदुकीतून अनेक फैरी झाडल्या. गोळीबारात तिघांना दुखापत झाली असून स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत जखमींना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

https://prahaar.in/2026/05/21/success-in-saving-%e2%82%b9100-crore-in-cyber-crimes-in-mumbai/

घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी करत फॉरेन्सिक पथकालाही पाचारण केले आहे. जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. गोळीबारामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून संबंधित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. शहरातील भरवस्तीत झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here