Home ब्रेकिंग न्यूज Bandra Encroachment Removal Campaign : वांद्र्यातील दगडफेक प्रकरण तापलं! गरिब नगरमधून १६ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्र्यातील दगडफेक प्रकरण तापलं! गरिब नगरमधून १६ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
Bandra Encroachment Removal Campaign : वांद्र्यातील दगडफेक प्रकरण तापलं! गरिब नगरमधून १६ जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Bandra Encroachment Removal Campaign

मुंबई : मुंबईतील वांद्रे परिसरातील गरिब नगर येथे झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत १६ जणांना अटक केली आहे. परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. (Bandra Encroachment Removal Campaign)

https://prahaar.in/2026/05/21/leopard-attacks-again-in-pune-junnar-otur-10-year-old-girl-injured/

मिळालेल्या माहितीनुसार, दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर अचानक दगडफेक सुरू झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. काही वाहनांचे नुकसान झाल्याचीही माहिती समोर येत आहे. घटनेनंतर वांद्रे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर विशेष पथकाने कारवाई करत १६ जणांना ताब्यात घेतले. सर्व आरोपींवर दंगल, सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.(Bandra Encroachment Removal Campaign)

https://prahaar.in/2026/05/21/weather-update-imd-alert-the-next-15-hours-are-dangerous-thunderstorms-in-17-states-while-heatwave-in-north-india/

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

सध्या गरिब नगर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. (Bandra Encroachment Removal Campaign)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here