Home ब्रेकिंग न्यूज Sunil Tatkare – Devendra Fadnavis : सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Sunil Tatkare – Devendra Fadnavis : सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0
Sunil Tatkare – Devendra Fadnavis : सुनील तटकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
Sunil Tatkare - Devendra Fadnavis

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा रंगत असतानाच, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दिवंगत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच सुनील तटकरे ‘वर्षा’ बंगल्यावर पोहोचल्याने अजितदादांच्या पक्षात नक्की चाललंय काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने अलीकडे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख न केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या वरिष्ठ नेत्यांना डावलण्यात आल्यामुळे पक्षात उभी फूट किंवा धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. ही पार्श्वभूमी ताजी असतानाच, आधी पार्थ पवार आणि त्यानंतर सुनील तटकरे यांनी लागोपाठ मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.

https://prahaar.in/2026/05/19/uttarakhand-train-accident-a-major-train-accident-was-averted-in-rishikesh-3-coaches-of-ujjain-express-derailed/

अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीसाठी फिल्डिंग?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीचा मुख्य अजेंडा विधान परिषद निवडणूक हाच होता. खासदार सुनील तटकरे हे आपले सुपुत्र अनिकेत तटकरे यांना रायगड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पुन्हा एकदा विधान परिषदेच्या रिंगणात उतरवण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ २०२४ मध्ये संपला होता, तेव्हापासून ते पुन्हा सभागृहात जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. या निवडणुकीत महायुतीकडून अनिकेत तटकरे यांची उमेदवारी कशी सुरक्षित करता येईल आणि रायगडमधील विजयाचे गणित कसे जुळवता येईल, यावर फडणवीस आणि तटकरे यांच्यात सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.

https://prahaar.in/2026/05/19/supreme-court-to-deliver-verdict-today-on-stray-dog-menace-responsibility-in-bite-cases/

महायुतीमधील जागावाटपावरही चर्चा?

विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीत (भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी) अंतर्गत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला सन्मानजनक जागा मिळाव्यात आणि पक्षांतर्गत चाललेल्या नाराजीनाट्याला पूर्णविराम मिळावा, या दृष्टीने तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. या भेटीनंतर आता महायुतीमधील जागावाटपाचे सूत्र काय ठरणार आणि अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारीला भाजप हिरवा कंदील दाखवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here