पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात (NEET Paper Leak) अटकेत असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालय प्रशासनाने तातडीची बैठक घेत त्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीमध्ये त्यांचा सहभाग समोर आल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली.
https://prahaar.in/2026/05/19/petrol-diesel-price-hike-shock-to-the-common-man-again-petrol-diesel-prices-increase-for-the-second-time-in-four-days/
दरम्यान, सीबीआयने मनीषा मांढरे यांना अटक केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे. नीट पेपरफुटीच्या (NEET Paper Leak) या प्रकरणामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात आता आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांनाही सीबीआयने अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरसीसी क्लासच्या टेस्टमधील १०१ प्रश्नांपैकी अनेक प्रश्न नीट परीक्षेत आल्याचे समोर आले आहे. यामुळे या रॅकेटचा व्याप किती मोठा होता याची चर्चा सुरू झाली आहे. (NEET Paper Leak)
https://prahaar.in/2026/05/18/tragedy-strikes-engagement-procession-13-dead-aid-announced-for-kin-of-deceased/
मोटेगावकर यांच्याभोवती संशय निर्माण करणारा एक व्हिडीओही तपास यंत्रणांच्या हाती लागला आहे. त्याचबरोबर त्यांच्या आर्थिक व्यवहारांची ईडीकडून छाननी सुरू असून मालमत्ता आणि पैशांच्या व्यवहारांची तपशीलवार चौकशी केली जात आहे. (NEET Paper Leak)
https://prahaar.in/2026/05/18/coordination-between-the-municipal-corporation-and-the-railway-administration-is-essential-to-make-mumbai-flood-free/
नीट पेपरफुटी प्रकरणातील प्रमुख आरोपी :
पी. व्ही. कुलकर्णी – निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक, नीट प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये सहभाग तसेच या रॅकेटचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप.
प्रा. मनीषा मांढरे – बायोलॉजी प्राध्यापिका, मॉडर्न कॉलेज पुणे; प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये सहभाग
शिवराज मोटेगावकर – संचालक, आरसीसी कोचिंग क्लासेस; पेपरफुटी रॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय
शुभम खैरनार – नाशिकमधील बीएएमएस विद्यार्थी; श्रीमंत विद्यार्थ्यांना लक्ष्य करून लाखोंचे व्यवहार केल्याचा आरोप
मनीषा वाघमारे – पुण्यातील ब्युटी पार्लर चालक; विद्यार्थ्यांना सूत्रधारांशी जोडण्याची भूमिका
धनंजय लोखंडे – आयुर्वेद डॉक्टर, सध्या पुण्यात वास्तव्यास; विद्यार्थ्यांना पेपर पुरवणाऱ्या रॅकेटशी संपर्क जोडल्याचा संशय (NEET Paper Leak)