Home देश Sanjeev Arora in ED custody : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना सात दिवसांची ईडी कोठडीत

Sanjeev Arora in ED custody : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना सात दिवसांची ईडी कोठडीत

0
Sanjeev Arora in ED custody : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना सात दिवसांची ईडी कोठडीत
Sanjeev Arora

– – १५७ कोटींच्या बनावट व्यवहारांचा आरोप

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले पंजाब सरकारमधील मंत्री Sanjeev Arora यांना न्यायालयाने सात दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले आहे. रविवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ED) पुढील चौकशीसाठी त्यांची कोठडी मागितली आणि न्यायालयाने ती मंजूर केली.

सध्या संजीव अरोरा यांची गुरुग्राममधील एमजी रोड येथील ईडी कार्यालयात कसून चौकशी सुरू असून, आर्थिक व्यवहार, कंपन्यांचे दस्तऐवज आणि कथित बनावट निर्यातीसंदर्भातील माहिती तपासली जात आहे. अरोरा हे पंजाबमधील लुधियाना वेस्ट मतदारसंघाचे आमदार असून राज्य सरकारमध्ये महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.

ईडीने शनिवारी चंदीगड आणि गुरुग्राम येथील त्यांच्या विविध ठिकाणांवर मोठी छापेमारी केली होती. जवळपास दहा तास चाललेल्या या कारवाईनंतर शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांना चंदीगडमधून अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान अनेक महत्त्वाचे कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि आर्थिक व्यवहारांशी संबंधित माहिती जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

https://prahaar.in/2026/05/10/himanta-biswa-sarma-will-be-the-chief-minister-of-assam-again-elected-as-the-leader-of-the-legislature-party-for-the-second-consecutive-time/

ईडीच्या प्राथमिक तपासानुसार, संजीव अरोरा आणि त्यांच्याशी संबंधित काही कंपन्यांवर तब्बल १५७.१२ कोटी रुपयांच्या कथित बनावट विक्री व्यवहारांचे आरोप आहेत. तसेच शेल कंपन्यांच्या माध्यमातून बनावट निर्यात दाखवून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या व्यवहारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पैशांची अफरातफर आणि मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा दावा ईडीकडून करण्यात येत आहे.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, काही कंपन्यांनी कागदोपत्री व्यवहार दाखवून परदेशी निर्यातीचे व्यवहार उभे केले होते. मात्र प्रत्यक्षात मालाची देवाणघेवाण झाली नसल्याचा संशय आहे. या व्यवहारांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता तपासली जात आहे.

https://prahaar.in/2026/05/10/pm-narendra-modi-congress-only-practices-politics-of-lies-and-betrayal-pm-narendra-modi/

दरम्यान, या कारवाईनंतर पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे, संजीव अरोरा यांच्याकडून अद्याप या आरोपांवर अधिकृत सविस्तर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

ईडीकडून पुढील काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात असून, संबंधित कंपन्या आणि आर्थिक व्यवहारांची साखळी तपासली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here