मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या गाडीचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून सुप्रिया सुळे आणि त्यांच्या वाहनातील सर्वजण सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुंबई : शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या अर्धशतकांच्या आणि राशिद खानच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने जयपूरच्या सवाई मानसिंग ...
या घटनेनंतर स्वतः सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत अपघाताची माहिती दिली. त्यांनी संबंधित वाहनाचा क्रमांकही जाहीर केला. “जीजे 13 सीएफ 5257 या क्रमांकाच्या वाहनचालकाने अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवत आमच्या गाडीला बाजूने धडक दिली. सुदैवाने सर्वजण सुरक्षित आहोत. सीट बेल्ट लावला असल्यामुळे मोठा अनर्थ टळला,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
While travelling from Pune to Mumbai today, I had an awful experience on the highway when vehicle GJ13CF5257 rammed into my car from the side due to reckless driving. Thankfully, everyone is safe. Incidents like these are a serious reminder that overspeeding and negligence on… pic.twitter.com/WrOGsNzqLX
— Supriya Sule (@supriya_sule) May 9, 2026
नाशिकमधील चर्चित टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान (Nida Khan) हिला आश्रय दिल्याच्या आरोपामुळे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ...






