अमेरिकेत नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय व्यावसायिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने एच-1बी व्हिसाधारकांच्या किमान वेतनात तब्बल ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. अमेरिकन नागरिकांच्या रोजगार आणि वेतनहितांचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे, जेणेकरून परदेशी कामगार कमी वेतनावर अमेरिकन नागरिकांची जागा घेऊ शकणार नाहीत.
https://prahaar.in/2026/05/10/mim-corporator-in-trouble-in-nida-khan-case-municipal-corporation-warns-of-bulldozer-on-matin-patels-house-and-office/
या प्रस्तावामुळे उद्योग क्षेत्रात नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. तज्ज्ञांच्या मते, वेतनातील या मोठ्या वाढीमुळे लहान कंपन्यांसाठी परदेशी प्रतिभावान उमेदवारांना, विशेषतः फ्रेशर्सना, नियुक्त करणे अत्यंत कठीण होऊ शकते.
https://prahaar.in/2026/05/10/shaina-nc-the-new-chairperson-of-the-state-womens-commission/
या प्रस्तावावर २६ मेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांकडून मते मागवण्यात आली आहेत. त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे, २०२० मध्येही डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अशाच प्रकारचे बदल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कायदेशीर आव्हानांमुळे तो निर्णय रोखण्यात आला होता.
अलीकडेच, सप्टेंबर २०२५ मध्ये राष्ट्राध्यक्षीय आदेशाद्वारे एच-1बी उमेदवारांवर एक लाख डॉलर शुल्क लावण्यात आले होते. आता वेतनवाढीचा हा नवा प्रस्ताव परदेशी व्यावसायिकांसाठी अमेरिकेतील संधींचा मार्ग आणखी कठीण करणारा ठरू शकतो.