मुंबई : शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्या अर्धशतकांच्या आणि राशिद खानच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर गुजरात टायटन्सने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा ७७ धावांनी पराभव केला. या दणदणीत विजयाचा परिणाम गुणतालिकेवरही झाला. या सामन्यापूर्वी गुजरातचा नेट रन रेट -०.५ होता, जो आता वाढून +०.२२८ झाला आहे. ११ सामन्यांमध्ये ७ विजय आणि ४ पराभवांसह गुजरातचे आता १४ गुण झाले असून, ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. गुजरातच्या विजयामुळे पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला मोठा फटका गुणतालिकेत बसला आहे.
https://prahaar.in/2026/05/10/mim-corporator-in-trouble-in-nida-khan-case-municipal-corporation-warns-of-bulldozer-on-matin-patels-house-and-office/
https://prahaar.in/2026/05/10/major-oil-spill-in-the-sea-near-kharg-island-global-markets-are-in-turmoil-amid-tensions-in-hormuz/
जसजशी लीग पुढे सरकत आहे, तसतसे कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचा मार्ग अधिकाधिक कठीण होत चालला आहे. दिल्ली, लखनौ आणि मुंबई जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात, तर हैदराबाद आणि गुजरातकडे प्रत्येकी १४ गुण आहेत. कोलकाता १७ गुणांपर्यंत पोहोचू शकतो, तर चेन्नई जास्तीत जास्त १८ गुणांपर्यंत पोहोचू शकतो. अव्वल ५ संघ हे गुण ओलांडू शकतात, ज्यामुळे या संघांसाठी प्लेऑफची शक्यता संपुष्टात येऊ शकते.