मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एका रात्रीत मोठा बदल पाहायला मिळाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. अनेक दिग्गज सेलिब्रिटी (Celebrities) आणि इन्फ्लुएंसर्सच्या (Influencers) अकाउंटवरील लाखो फॉलोअर्स (Followers) अचानक कमी झाल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया युजर्स (Social Media Users) या घटनेला आता ‘Great Purge of 2026’ असे म्हणत आहेत. या मोठ्या कारवाईचा फटका भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli), अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि फुटबॉल स्टार क्रिस्तियानो रोनाल्डोसह (Cristiano Ronaldo) अनेक जागतिक सेलिब्रिटींना बसला आहे.
https://prahaar.in/2026/05/07/strait-of-hormuz-big-relief-news-from-the-strait-of-hormuz-preliminary-agreement-between-america-and-iran-oil-prices-collapse/
इन्स्टाग्रामची (Instagram) मूळ कंपनी ‘मेटा’ने (Meta) प्लॅटफॉर्मवरील बनावट, निष्क्रिय आणि बॉट अकाऊंट्सविरोधात (Bot Account) मोठी मोहीम सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. कंपनीने अद्याप अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नसली, तरी काही तासांतच अनेक सेलिब्रिटींच्या फॉलोअर्समध्ये (Celebrities Followers) मोठी घट झाल्याचे दिसून आले. सोशल मीडिया (Social Media) अधिक पारदर्शक (Transperant), सुरक्षित (Safe) आणि विश्वासार्ह (Trustworthy) बनवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
https://prahaar.in/2026/05/08/well-knock-them-out-harder-trump-warns-iran-of-harsher-military-action-after-3-us-ships-came-under-fire-in-hormuz/
भारतीय सेलिब्रिटींनाही या कारवाईचा मोठा फटका बसला आहे. विराट कोहली आणि प्रियांका चोप्रा यांच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्येही लक्षणीय घट दिसून आली आहे. केवळ वैयक्तिक सेलिब्रिटीच नव्हे, तर BTS (बीटीएस) आणि BLACKPINK (ब्लॅककपिंक) यांसारख्या लोकप्रिय के-पॉप ग्रुप्सच्या (K-Pop) अकाऊंट्सवरही या मोहिमेचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
या मोहिमेमुळे इन्फ्लुएंसर मार्केटिंगच्या (Influencer Marketing) क्षेत्रातही मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत फॉलोअर्सच्या आकड्यांवर चालणाऱ्या सोशल मीडिया विश्वात आता ‘रिअल ऑडियन्स’ (Real Audience) आणि ‘ऑर्गॅनिक इंगेजमेंट’ला (Organic Engagement) अधिक महत्त्व मिळू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
‘ग्रेट पर्ज 2026’ मोहिमेमुळे सोशल मीडियावर जणू भूकंपच आला आहे. लाखो फॉलोअर्स एका झटक्यात कमी झाल्याने अनेक चाहतेही आश्चर्य व्यक्त करत आहेत. आता मेटाची ही कारवाई इथेच थांबणार की आणखी मोठ्या प्रमाणावर अकाऊंट्स हटवले जाणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.