मुंबई : आपल्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विजय कारंडे याच्याविरोधात पत्नीने दाखल केलेली तक्रार अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी असून, अशा हीन प्रवृत्तीच्या अधिकाऱ्याला प्रशासकीय जबाबदारीत कोणतेही स्थान असणार नाही, अशी भूमिका भाजप नेते आणि मंत्री अतुल सावे यांनी घेतली आहे. या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही सावे यांनी दिले आहेत.
&https://prahaar.in/2026/05/07/suvendu-adhikari-pa-death-chandranath-rath-assassination-a-blood-stained-warning-to-fix-policing-in-bengal/nbsp;
विजय कारंडे याने आपल्या पत्नीला आणि मुलाला बॅटने बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री अतुल सावे यांनी तत्काळ आपली भूमिका स्पष्ट केली. सावे म्हणाले की, “आमचे महायुती सरकार महिलांचे संरक्षण आणि सक्षमीकरणासाठी आग्रही आहे. कौटुंबिक हिंसाचाराचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”
https://prahaar.in/2026/05/07/bihar-oath-ceremony-2026-samrat-chaudhary-s-mega-cabinet-expansion-in-bihar-modi-shahs-presence-at-gandhi-maidan-for-the-swearing-in-ceremony/